नळदुर्गमध्ये मनाई आदेश झुगारुन कापड दुकान चालू ठेवणाऱ्यासह ग्राहकांवर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

नळदुर्ग: कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी विविध मनाई आदेश जारी केले आहेत. असे असतांनाही ते मनाई आदेश झुगारुन जिलानी अब्दुलकलाम कुरेशी, रा. नळदुर्ग यांनी दि. 20 मे रोजी 11.00 वा. सु. गावातील आपले ‘गुडलक वेअर’ हे कापड दुकान व्यवसायास चालू ठेवले तर ग्राहक- 1)शिवाजी लवटे, रा. गुंजोटी, ता. उमरगा 2)महादेव गुंजोटे, रा. भोजगा, ता. लोहारा 3)अनिल दबडे, रा. लोहगांव, ता. तुळजापूर 4)दगउु लकडे, रा. मानेवाडी, ता. तुळजापूर 5)याकुब जहागिरदार, रा. नळदुर्ग या सर्वांनी नमूद कापड दुकानात गर्दी करुन कोविड- 19 संसर्गाची शक्यता निर्माण होण्याची निष्काळजीपणाची कृती केली. यावरुन नळदुर्ग पो.ठा. चे पोकॉ- अमोल फत्तेपुरे यांनी सरकातर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269, 270 सह साथीचे रोग प्रतिबंध कायदा कलम- 2, 3, 4 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ब्रेक द चेन: दि. 20.05.2021 रोजी 111 पोलीस कारवायांत 27,900/-रु. दंड वसुल

उस्मानाबाद  - लॉकडाउन काळात खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा आदेश आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत दि. 20.05.2021 रोजी खालील तीन प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.

1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: एकुण 03 कारवायांत- 600/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: एकुण 19 कारवायांत- 9,500/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग करीता जमीनीवर खुना न आखणे, दुकाना समोर गर्दी निर्माण करणाऱ्या व्यक्ती- दुकान चालक यांच्याविरुध्द एकुण 89 कारवायांत 17,800/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

From around the web