तुळजापुरात अवैध गुटखा जप्त

 
Osmanabad police

तुळजापूर: आत्माराम बबन जाधव, रा. शुक्रवार पेठ, तुळजापूर हे आपल्या घरी महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत गुटखा विक्रीच्या उद्देशाने बाळगले असल्याची गोपनीय खबरेवरुन तुळजापूर पो.ठा. च्या पथकास मिळाली होती. यावर पथकाने दि. 10 जुलै रोजी 11.00 वा. सु. नमूद ठिकाणी छापा मारुन जाधव यांच्या घरातून 1,90,885 ₹ किंमतीचा गुटखा, सुगंधी सुपारी, तंबाखुजन्य पदार्थ हा प्रतिबंधीत माल जप्त केला होता.     

 अन्नसुरक्षा अधिकारी-  प्रमोदकुमार काकडे यांनी सदर गुटखा हा अन्नपदार्थ प्रतिबंधीत असल्याची खात्री करुन दि. 12 जुलै रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरवेरुन भा.दं.सं. कलम- 328, 188, 272, 273 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम- 26, 27, 23 सह वाचन अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण

 उस्मानाबाद  - पिंप्री (बे.) येथील कांचन नाईकवाडी या दि. 12 जुलै रोजी आपल्या शेतात असतांना पुर्वीच्या वादातून शेजारील शेतकरी- संगिता व नेताजी माळी या दोघां पती- पत्नींनी कांचन यांना जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या कांचन नाईकवाडी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 506, 34 सह ॲट्रॉसिटी कायद्यांर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                  

From around the web