येरवडा कारागृहातून फरार झालेला आजन्म कारावासाचा शिक्षाबंदी अटकेत

 
येरवडा कारागृहातून फरार झालेला आजन्म कारावासाचा शिक्षाबंदी अटकेत

उस्मानाबाद -  दत्ता किसन गायकवाड, वय 43 वर्षे, रा. कवठा, ता. उमरगा हे उमरगा पो.ठा. गु.र.क्र. 156 / 2005 या खूनाच्या गुन्ह्यात आजन्म कारावासाची शिक्षा येरवडा, पुणे येथील कारागृहात भोगत असतांना दि. 16.01.2021 रोजी फरार झाला होता. त्यावरुन त्याच्याविरुध्द येरवडा पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 224 अंतर्गत गु.र.क्र. 34/2021 दाखल आहे. 

नमूद कैद्याचा मुळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातील असल्याने तो कधीतरी  नक्कीच गावी परतेल या शक्यतेवरुन उस्मानाबाद पोलीसांनी खबरे सक्रीय केले होते. दत्ता गायकवाड हे आपल्या गावी आले असल्याची गोपनीय खबर मिळताच स्था.गु.शा. च्या पोउपनि- सदानंद भुजबळ, पोहेकॉ- जगदाळे, ठाकुर, साळुंके, पोना- शेळके, पोकॉ- सर्जे यांच्या पथकाने त्यास  19.03.2021 रोजी ताब्यात घेउन पुणे पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

पाहिजे आरोपी अटकेत

उस्मानाबाद - तुळजापूर पो.ठा. गु.र.क्र. 410/2020 भा.दं.सं. कलम- 457, 380 या घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी- अविनाश दिलीप भोसले, रा. पाटोदा फाटा, ता. तुळजापूर यांचा पोलीस 2 वर्षांपासून शोध घेत होते. त्यांस स्था.गु.शा. च्या पोउपनि- श्री पांडुरंग माने, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, कावरे, पोकॉ- आरसेवाड यांच्या पथकाने 19 मार्च रोजी ऑल आउट ऑपरेशन दरम्यान पाटोदा फाटा येथून ताब्यात घेउन पुढील कार्यवाहिस्तव तुळजापूर पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.


सार्वजनिक ठिकाणी धोकादायकपणे वाहन उभे करणाऱ्या चालकांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद - सार्वजनिक ठिकाणी रहदारीस धोका निर्माण होईल, मानवी जिवीतास धोका होईल अशा प्रकारे वाहन उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन करणाऱ्या 4 वाहन चालकांवर 4 गुन्हे  19 मार्च रोजी दाखल करण्यात आले.

1) सुमित बनसोडे, रा. सुंदरवाडी व शिवशंकर वाले, रा. डाळींब या दोघांनी आपापल्या ताब्यातील अनुक्रमे ऑटोरीक्षा क्र. एम.एच. 25 एम 1780 व ऑटोरीक्षा क्र. एम.एच. 25 एएल 0633 अशी दोन वाहने येणेगुर बसस्थानकजवळील रस्त्यावर निष्काळजीपणे, धोकादायकरित्या उभे केले असतांना मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले.

2) दत्ता शेंडगे, रा. ढेकरी व मारुती लाड, रा. तुळजापूर या दोघांनी आपापल्या ताब्यातील अनुक्रमे ऑटोरीक्षा क्र. एम.एच. 25 एके 0711 व ऑटोरीक्षा क्र. एम.एच. 25 एके 0813 अशी दोन वाहने तुळजापूर बसस्थानक येथे निष्काळजीपणे, धोकादायकरित्या उभे केले असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले.

सार्वजनिक ठिकाणी गाड्यावर निष्काळजीपणे अग्नी प्रज्वलीत करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 उस्मानाबाद : उसमानाबाद येथील श्रीकांत कुंभार यांनी 19 मार्च रोजी उस्मानाबाद येथील टपाल कार्यालयाजवळ आपल्या हातगाड्यावर अग्नी प्रज्वलीत करुन मानवी जिवीतास धोका निर्माण होईल असे निष्काळजीपणाचे कृत्य केले. यावरुन पोलीसांनी सरकातर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 285 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web