परंड्यात ऊसतोड मजूर पुरवतो म्हणून फसवणूक 

 

परंडा: वागेगव्हाण, ता. परंडा येथील नेमीनाथ इंद्रजित जगताप यांना ऊसतोड मजुर पुरवण्यासाठी शिराढोन, ता. कळंब येथील रमेश राठोड, आकाश राठोड, माणिक राठोड या तीघांनी सन- 2019 मध्ये करार केल्याने नेमीनाथ यांनी माणिक राठोड यांच्या बँक खात्यात वेळोवेळी एकुण 15,95,000 ₹ मोबदला जमा केला होता. परंतू नमूद तीघांनी नेमीनाथ यांना करारा प्रमाणे ऊसतोड मजुर पुरवले नाहीत व पैसेही परत केले नाहीत. अशा मजकुराच्या नेमीनाथ जगताप यांनी 11 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 406, 420, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 

 तुळजापूर: तीर्थ (खु.), ता. तुळजापूर येथील अजय प्रकाश जाधव हे 10 मार्च रोजी 15.30 वा. सु. तुळजापूर येथील आडत लाईल येथे होते. यावेळी पुर्वीच्या वादाच्या कारणावरुन तुळजापूर येथील ऋषी कोथींबीरे, मुकेश भांगे, गिरीष कदम या तीघांनी अजय जाधव यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, अवजड वस्तुने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या अजय जाधव यांनी 11 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब: समतानगर कळंब येथील अतुल संभाजी गायकवाड हे 10 मार्च रोजी 20.00 वा. गल्लीतील किराणा दुकानासमोर थांबले होते. यावेळी पुर्वीच्या वादावरुन गावकरी- संतोष व अतुल टोपे या दोघा बंधुंनी अतुल गायकवाड यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी देउन धक्काबुक्की केली तसेच धारधार वस्तुने अतुल गायकवाड यांच्या पाठीत वार करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या अतुल गायकवाड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

सार्वजनिक ठिकाणी गाड्यावर निष्काळजीपणे अग्नी प्रज्वलीत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद - उस्मानाबाद येथील 1)दिलीप माणिक शिंदे 2)आकाश मरगु मंजुळे या दोघांनी 11 मार्च रोजी उस्मानाबाद बसस्थानक समोरील रस्त्यावर मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा निष्काळजीपणे आपापल्या हातगाड्यावर अग्नी प्रज्वलीत केला. यावरुन पोलीसांनी सरकातर्फे दिलेल्या स्वतंत्र 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 285 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

                                                                                   

From around the web