कोम्बिंग ऑपरेशन करीत चार अटृल दरोडेखोरांना केले जेरबंद

४ लाख ४२ हजार २०० रुपयांचा माल केला हस्तगत
 
कोम्बिंग ऑपरेशन करीत चार अटृल दरोडेखोरांना केले जेरबंद

उस्मानाबाद  - सोने, मोबाईल यासह विविध किमती वस्तूंच्या चोऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यात करून सोलापूर जिल्ह्यात पसार होणाऱ्या अटल दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व आरएसपी प्लाटूनच्या पथकाने दि. १८ मे पहाटे रातोरात रावविली. या दरोडेखोरांच्या ताब्यातून ४ लाख ४२ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,‌  दि. १८ मे रोजी सकाळी ३ ते ७ वाजण्याच्या दरम्यान उस्मानाबाद ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतील जुनोनी शिवारामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच आरएसपी प्लाटूनमधील पोलीस अंमलदार यांनी मिळून कोम्बिंग ऑपरेशन केले. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये खालील ४ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. 

विजय बाबलींग्या भोसले (वय ४५ वर्ष) रा. झरेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर बाळू शहाजी शिंदे (वय ४० वर्षे) राहणार लाडोळा तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हल्ली मुक्काम (सर्वांचा) उस्मानाबाद तालुक्यातील जुनोनी, करण दिलीप भोसले रा. लाडोळा तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हल्ली मुक्काम जुनोनी, इंदुबाई दिलीप भोसले (वय ४५ वर्षे) रा. लाडोळा तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हल्ली मुक्काम जुनोनी व एक विधिसंघर्षग्रस्त बालक लाडोळा हमु जुनोनी या आरोपींना जेरबंद केले आहे.

त्यांच्या ताब्यातून पुढीलप्रमाणे माल जप्त करण्यात आला. यामध्ये विविध कंपन्या चे १९ मोबाईल किंमत एक लाख १३ हजार रुपये, तर तीन मोटारसायकल किंमत ९५ हजार रुपये, १० ग्राम सोन्याचे गलसर किंमत १९ हजार २०० रुपये, तसेच रोख रक्कम १५ हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली व्यगणार कार किंमत २ लाख रुपये असा एकूण ४ लाख ४२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • खलील गुन्हे उघडकीस आणले. त्यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील पोस्टे बेंबळी गुरन ८४/२०२१ भादंवि कलम ४५७, ३८०,
  • पोस्टे उस्मानाबाद शहर गुरन ११७/२०२१ भादंवि कलम ३८०,
  • पोस्टे ढोकी गुरन १५१/२०२१, भादंवि कलम ३७९ 
  • सोलापूर जिल्ह्यातील पोस्टे कुर्डुवाडी येथे गुरन ४९/२०२१ भादंवि कलम ३७९, 
  • बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहर पोस्ट येथे गुरन ३१/२०२१ भादंवि कलम ३७९, पाहिजे आरोपी एक पोस्टे बेंबळी ८४/२०११ भादंवि कलम ३०७, ३६३
  • एक  मिसिंग मोबाईल पोस्टे उस्मानाबाद शहर मिसिंग नंबर २१६/२०२१,
  • सीआरपीसी ४१ (१)(ड) ची एक कारवाई पोस्टे उस्मानाबाद ग्रामीण या विविध पोलिस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल होते. मात्र चोरी करून ते उस्मानाबाद जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात पसार होऊन पोलिसांना हुलकावणी देत होते.

पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, सपोनि निलंगेकर, पोउपनी पी.व्ही. माने, पोउपनि भुजबळ, पोह काझी, पोना शेळके, घुगे, सय्यद, चव्हाण, मपोना टेळे, पोका सावंत, ढगारे, सर्जे, कोळी, मरलापले, अरसेवाड, ठाकूर मपोका होळकर एक आरसीपी प्लाटून
चालक पोह घुगे, चापोना कावरे यांनी केली.

From around the web