उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल 

 

उस्मानाबाद  - जहीरुन्नीसा शेख या 5 एप्रिल रोजी  उस्मानाबाद बस स्थानकात बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधुन एका महीलेने त्यांच्या पर्स मधील 2,000 रु. रक्कम चोरली. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 ढोकी: अक्षय शिंदे, रा. ‍किनी यांनी घराबाहेर लावलेली त्यांची  होन्डा शाईन्‍ मो. सा.क्र. एम. एच. 25 एएच 1220 ही 2 एप्रिल रोजी  पहाटे अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 तामलवाडी: प्रभाकर आंधळकर, रा. वडगाव (काटी) यांच्या शेतातील शेडचा पत्रा 5-6 एप्रिल दरम्यानच्या रात्री  अज्ञाताने कापुन आत ठेवलेले कुपनलिकेचे 20 नळ चोरुन नेले. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा: नितीन कटारे, रा. जेवळी यांच्या घराचे कुलूप 5-6 एप्रिल दरम्यानच्या रात्री  अज्ञाताने तोडुन घरातील 18 ग्रॅम सोन्याचे दागीने व रोख 30,000 रु. चोरुन नेले. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

2 गुन्ह्यातील 2 आरोपींना आर्थिक दंडाची शिक्षा

परंडा: राजेश शिंदे व अंबुज तुटके यांनी मानवी जिवीतास धोका होईल अशा निष्काळजीपणे खानावळीत अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम-  285 चे उल्लंघन केल्याने त्यांना प्रत्येकी 1,000 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, परंडा यांनी आज 6 एप्रील रोजी सुनावली आहे.

फसवणुक

 कळंब :  तुमच्या बँक खात्यात 4,10,295 रु. वर्ग करण्यात आले आहेत असा संदेश श्रीनिवास तांबरे रा. कळंब यांच्या भ्रमणध्वनीवर 3 एप्रिल रोजी आला. यावर तांबरे यांनी त्या संदेशातील लिंक उघडुन त्यात आपल्या बँक खात्याची माहीती व पासवर्ड भरले असता 16 व्यवहारांत 4,10,295 रु. अन्यत्र स्थलांतरीत झाले. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 व माहीती तंत्रज्ञान कायदा कलम 66 सी. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 लैंगिक छळ

उस्मानाबाद -  जिल्हयातील एका गावातील एक 32 वर्षीय विवाहित महिला 5 एप्रिल रोजी दुपारी शेतात नांगरत असतांना गावातीलच एका तरुणाने नांगरणी करण्यास विरोध करुन तिला मारहाण केली. तसेच  तिचे कपडे फाडुन तिचा विनयभंग करुन तिला ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संबंधित महिलेने  05 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354, 323,504,506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web