तीन गुन्ह्यांतील चार आरोपींना न्यायालयाने ठोठावली आर्थिक दंडाची शिक्षा

 
Osmanabad police

 उस्मानाबाद - प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, परंडा यांनी आंबी पो.ठा. येथे दाखल 2 गुन्ह्यातील 3 आरोपींना आज दि. 28 मे रोजी खालीलप्रमाणे दंडात्मक शिक्षा सुनावल्या आहेत.

उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. गु.र.क्र. 17 / 2016 या गुन्ह्यातील आरोपी- रामेश्वर गोविंद पवार, रा. अंबेजवळगे, ता. उस्मानाबाद यांनी भा.दं.सं. कलम- 354 (ब), 323, 504, 34 चे उल्लंघन केल्याबद्दल 3,000 ₹ दंडाची व दंड न भरल्यास 10 दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. गु.र.क्र. 16 / 2018 या मारहाणीच्या गुन्ह्यातील आरोपी- 1)रामा अंकुश गोफणे 2)आण्णासाहेब अंकुश गोफणे, दोघे रा. सोनेगाव, ता. उस्मानाबाद या दोघांनी भा.दं.सं. कलम- 327, 324, 323, 504, 506, 34 चे उल्लंघन केल्याबद्दल प्रत्येकी 500 ₹ दंड व दंड न भरल्यास 3 दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

 परंडा: सार्वजनिक ठिकाणी मानवी जिवीतास धोका होईल अशी अग्नी विषयक निष्काळजीपणाची कृती करणाऱ्या सगर नियामक तुटके, रा. परंडा यांना भा.दं.सं. कलम- 285 च्या उल्लंघनाबद्दल मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, परंडा यांनी दोषी ठरवून 1,000 ₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.


पोलीस नाकाबंदी दरम्यान 545 कारवायांत 1,19,900 ₹ ‘तडजोड शुल्क वसुल

 कोविड- 19 लॉकडाऊन काळातही अनेक लोक गौण कारणास्तव, विनाकारण रस्त्याने वाहने घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा, जरब बसावी या उद्देशाने महत्वाच्या रस्त्यांवर सकाळी 08.00 ते 20.00 वा. दरम्यान पोलीस नाकाबंदी केली जात असुन मोटार वाहन कायदा- नियम व कोविड- 19 संबंधी मनाई आदेशांची अंमलबजावनी केली जात आहे. या मोहिमेदरम्यान दि. 27 मे रोजी सर्व पोलीस ठाणी व शहर वाहतूक शाखा यांनी एकुण 545 कारवाया केल्या असुन त्यातून 1,19,900 ₹ ‘तडजोड शुल्क’ नियम भंग करणाऱ्यांकडून वसुल केले आहे.

 ब्रेक द चेन: दि. 27.05.2021 रोजी 508 पोलीस कारवायांत 1,07,300/-रु. दंड वसुल

उस्मानाबाद : लॉकडाउन काळात खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा आदेश आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत दि. 27.05.2021 रोजी खालील तीन प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.

1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: एकुण 01 कारवाईत- 200/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: एकुण 19 कारवायांत- 9,500/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग करीता जमीनीवर खुना न आखणे, दुकाना समोर गर्दी निर्माण करणाऱ्या व्यक्ती- दुकान चालक यांच्याविरुध्द एकुण 488 कारवायांत 97,600/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

From around the web