उस्मानाबाद जिल्ह्यात चार अपघातात दोन ठार, दोन जखमी 

 
उस्मानाबाद जिल्ह्यात चार अपघातात दोन ठार, दोन जखमी

उमरगा: करबसप्पा ररसिंग मगरे, रा. खजुरी बॉर्डर वस्ती, ता. आळंद, जि. गुलबर्गा हे दि. 19.11.2020 रोजी 15.00 वा. सु. उमरगा चौरस्ता येथील आळंद रस्त्याच्या कडेला थांबले होते. यावेळी वाहन क्र. एम.एच. 12 वायए 5448 च्या चालकाने वाहन निष्काळजीपणे चालवून करबसप्पा मगरे यांना धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर संबंधीत वाहनचालक घटनास्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या करबसप्पा मगरे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 आणि मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 वाशी: चालक- प्रशांत बळीराम शिनगारे, रा. पारा, ता. वाशी यांनी दि. 21.11.2020 रोजी 10.30 वा. सु. गावातील पारा चौकात स्विफ्ट डिझायर कार क्र. एम.एच. 12 क्युजी 6265 ही निष्काळजीपणे, भरधाव वेगात चालवून चौकात उभे असलेले गावकरी- मच्छिंद्र धर्मा माहोळकर, वय 70 वर्षे यांना समोरुन धडक दिली. या अपघातात मच्छिंद्र माहोळकर हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अपघातानंतर नमूद वाहन चालक घटनास्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या जालिंदर मच्छिंद्र मोहोळकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 उमरगा: शिवाबाई काशीनाथ गायकवाड, वय 60 वर्षे, रा. जवळगा बेट, ता. उमरगा या दि. 20.11.2020 रोजी 22.30 वा. सु. लक्ष्मी पाटी जवळील रस्त्याने पायी चालत जात होत्या. यावेळी अज्ञात वाहनाने शिवाबाई गायकवाड यांना धडक दिल्याने शिवाबाई या गंभीर जखमी होउन मयत झाल्या. अपघातानंतर संबंधत वाहन चालक घटनास्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या राजेंद्र काशीनाथ गायकवाड (मयताचा मुलगा) यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद (ग्रा.): शुभम शिवाजी अंकुशराव व सागर सुनिल सोनवणे, दोघे रा. कौडगाव (खा.), ता. उस्मानाबाद हे दोघे दि. 18.11.2020 रोजी 14.30 वा. सु. भडाचीवाडी शिवारातील शुभम मंगल कार्यालयासमोरील रस्त्याने ॲक्टीव्हा स्कुटर क्र. एम.एच. 25 एई 9105 ने प्रवास करत होते. यावेळी मारुती सुझूकी कारक्र. एम.एच. 44 जी 3919 च्या अज्ञात चालकाने कार निष्काळजीपणे चालवून शुभम अंकुशराव चालवत असलेल्या नमूद स्कुटरला धडक दिली. या अपघतात शुभम व सागर हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर नमूद कारचा अज्ञात चालक घटनास्थळावरुन कारसह पसार झाला. अशा मजकुराच्या शुभम अंकुशराव यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 आणि मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web