उस्मानाबाद जिल्ह्यात चार अपघातात चार ठार, पाच जखमी 

 

उमरगा: चालक- ओंकार सोमशंकर कोटटरगे, रा. मुरुम, ता. उमरगा यांनी 10 मार्च रोजी 16.00 वा. सु. चौरस्ता- आळंद रस्त्यावर अरटीगा कार क्र. एम.एच. 24 व्हि 8917 ही निष्काळजीपणे चालवल्याने रस्त्याबाजूच्या झाडास धडकली. या अपघातात चालक- ओंकार कोटटरगे हे मयत झाले तर प्रवासी- बबिता शिवाजी राठोड, भाग्यश्री माने, लखन मानकर, सर्व रा. मुरुम हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या बबिता राठोड यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 3047 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत बेडगा, ता. उमरगा येथील मुकेश राम माने हा 05 मार्च रोजी 08.15 वा. सु. उमरगा येथील मुगळे हॉस्पीटल समोरील रस्त्याने पायी जात होता. यावेळी उमरगा येथील श्रीकांत राजेंद्र सुर्यवंशी यांनी मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एपी 9322 ही निष्काळजीपणे चालवून मुकेशला पाठीमागून धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. अशा मजकुराच्या मुकेशचे पिता- राम माने यांनी 13 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 उस्मानाबाद -  जहिर मोमीन, वय 48 वर्षे व सुदामती शेरखाने, वय 60 वर्षे, दोघे रा. उस्मानाबाद हे 11 मार्च रोजी 14.45 वा. उस्मानाबाद- कळंब असा मोटारसायकलने प्रवास करत होते. दरम्यान आळणी फाटा येथे अज्ञात चालकाने शिरुर- तुळजापूर एसटी बस क्र. एम.एच. 11 बीएल 9248 ही निष्काळजीपणे चालवून शेरखाने यांच्या मो.सा. ला धडक दिली. या अपघातात मो.सा. वरील नमूद दोघे गंभीर जखमी होउन मयत झाले आहेत. असे निवेदन मोमीन यांच्या भावाने अनैसर्गीक मृत्यु क्र. 12/2021 फौ.प्र.सं. कलम- 174 च्या चौकशीत दिल्याने अज्ञात चालकाविरुध्द भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 तुळजापूर: हिप्पररगा (रवा), ता. लोहारा येथील तानाजी विठ्ठल गाटे, वय 35 वर्षे हे 10 मार्च रोजी 14.30 वा. तुळजापूर- नळदुर्ग रस्त्यावरील तीर्थ (बु.) शिवारातून प्रवास करत होते. दरम्यान चालक- हुसेन महेबुब शेख, रा. नंदीयाल, जि. कर्नुल, राज्य- आंध्रप्रदेश यांनी ट्रक क्र. ए.पी. 21 टीए 5529 ही निष्काळजीपणे चालवून गाटे यांच्या मो.सा. ला धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या  महेश पांडुरंग गाटे यांनी 13 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web