उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या चार घटना 

 
उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या चार घटना

 कळंब: हावरगांव, ता. कळंब येथील सुधाकर उत्तम कोल्हे यांसह 3 कुटूंबीय व अतुल आबासाहेब कोल्हे यांसह 5 कुटूंबीय अशा दोन्ही कुटूंबाचा 23 मार्च रोजी 07.30 वा. सु. हावरगांव शेत शिवारात वाद उद्भवला. यात दोन्ही कुटूंबातील सदस्यांनी परस्परविरोधी कुटूंबीयांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या सुधाकर कोल्हे व अतुल कोल्हे यांनी परस्परविरोधी दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 337, 323, 504, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

 तुळजापूर: शेतातील बांध फोडल्याच्या कारणावरुन हंगरगा पाटी, ता. तुळजापूर येथील नन्नवरे कुटूंबातील देविदास, छाया, अमर, शैला यांसह शोभा व संजय झाडपिडे यांच्या गटाचा गावकरी- नन्नवरे कुटूंबातील हरिश्चंद्र, शालन, रविंद्र, प्रिया यांसह रमेश देडे, बापु, अनिता यांच्या गटाशी 23 एप्रील रोजी 17.00 वा. सु. हंगरगा पाटी शेत शिवारात वाद झाला. या वादाचे पर्यावसान हानामारीत होउन दोन्ही गटांतील व्यक्तींनी परस्पर विरोधी गटांतील व्यक्तींस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या अमर नन्नवरे व हरीश्चंद्र नन्नवरे यांनी परस्परविरोधी दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 143, 147, 149 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

उमरगा: पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन पळसगांव तांडा, ता. उमरगा येथील लखन धनु चव्हाण यांसह 8 कुटूंबीय व रमेश सुभाष राठोड यांसह 8 कुटूंबीय अशा दोन्ही कुटूंबाचा 23 मार्च रोजी 07.30 ते 08.00 वा. चे दरम्यान राहत्या तांड्यावर वाद झाला. यात दोन्ही कुटूंबातील सदस्यांनी परस्परविरोधी कुटूंबीयांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी पाईप, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या लखन चव्हाण व रमेश राठोड यांनी परस्परविरोधी दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 337, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

उस्मानाबाद : उमाकांत जगन्नाथ घोगरे, रा. उपळा, ता. उस्मानाबाद यांना जुन्या भांडणाच्या कारणावरुन 23 एप्रील रोजी 15.30 वा. सु. शिगोंली शिवारातील रायगड ढाब्यासमोर अक्षय जाधव, साई पवार, राहुल सुर्यवंशी, तीघे रा. उस्मानाबाद यांनी लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या उमाकांत घोगरे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                  

From around the web