उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या चार घटना 

 

वाशी: मधुकर गायकवाड, रा. सरमकुंडी, ता. वाशी यांना गावकरी- मनोज व विश्वास शहाजी गायकवाड हे दोघे बंधू 29 मार्च रोजी 19.30 वा. सु. सरमकुंडी येथील शेतात कत्तीने, काठीने मारहाण करत होते. यावेळी तेथून जात असलेल्या मनोज बबन गिरी, रा. यसवंडी, ता. वाशी यांनी मधुकर गायकवाड यांचा बचाव करण्याचा प्रयत्‍ केला असता नमूद दोघा बंधुंनी त्यांनाही शिवीगाळ करुन कत्तीने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मनोज गिरी यांनी 30 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत पारगाव, ता. वाशी येथील प्रकाश नामदेव मोटे यांनी 28 मार्च रोजी 18.30 वा. सु. आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत ज्वारीचे पोते ठेवले होते. यावेळी नातेवाई- ज्ञानेश्वर व धनंजय भागवत मोटे या दोघा बंधुंनी, “तु माझ्या जागेत ज्वारीचे पोते का ठेवले.” असा जाब प्रकाश मोटे यांना विचारुन प्रकाश यांच्या शीरावर बुक्क्या मारुन गंभीर जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या प्रकाश मोटे यांनी 30 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर: गोकुळ अर्जुन पवार, रा. वासुदेव गल्ली, तुळजापूर यांनी होळी समोरुन डुकरे नेल्याच्या कारणावरुन  गल्लीतीलच- 1)राजाभाऊ व्हटकर 2)संजय व्हटकर 3)संदीप व्हटकर 4)अजित रणदिवे यांनी 28 मार्च रोजी 19.00 वा. सु.गोकुळ पवार यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठी, दगडाने मारहाण केली. गोकुळ पवार यांच्या पत्नी त्यांच्या बचावास आल्या असता त्यांनाही धक्काबुक्की करुन ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत गोकुळ यांच्या नाकाचे व डाव्या हाताचे हाड मोडले आहे. अशा मजकुराच्या गोकुळ पवार यांनी 30 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
नळदुर्ग: प्रदिप शरणप्पा मंटगे, रा. जळकोट, ता. तुळजापूर हे 22 मार्च रोजी 19.30 वा. सु. आपल्या घरासमोरील जागेत मोटारसायकल लावत होते. यावेळी शेजारील राजा पाटील, वर्षा पाटील, प्रथमेश पाटील, शिवराज पाटील, सुनंदा पाटील, बाबा पाटील अशा सहा जणांनी मोटारसायकल लावण्याच्या कारणावरुन प्रदिप मंटगे यांसह त्यांची पत्नी- वैशाली यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, विटा, दगडाने मारहाण करुन त्या दोघांना जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. तसेच प्रदीप मंटगे यांच्या मोटारसायकलचे नुकसान केले. अशा मजकुराच्या प्रदिप मंटगे यांनी 30 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web