उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या चार घटना 

 
उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या चार घटना

उस्मानाबाद : रवीकिरण शितोळे रा. उस्मानाबाद यांची  स्प्लेंडर मो. सा. क्र. एम. एच. 25 एएक्स 1316 ही 06 एप्रिल रोजी पहाटे ओम नगर येथुन अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या रवीकिरण  यांनी दि. 09 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 कळंब : गुणवंत पवार रा. जवळा (खु) ता. कळंब यांच्या घरासमोर ठेवलेले 500 कि. ग्रॅ. वजनाचे लोखंडी गज व कोन, कटर, 50 कि. ग्रॅ. ज्वारीचे पोते अज्ञाताने 6 एप्रिल रोजी पहाटे चोरुन नेले. अशा मजकुराच्या गुणवंत पवार यांनी दि. 09 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : छगन सोमा पवार रा. वरुडा ता. उस्मानाबाद यांची मो. सा. क्र. एम. एच. 13 बीसी 3388 ही 06 एप्रिल रोजी दुपारी नगर परीषद ईमारती समोरील रस्त्या जवळुन अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या छगन पवार यांनी दि. 09 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 कळंब : श्रीगणेश लोमटे रा. जवळा (खु) ता. कळंब यांच्या घराच्या जिन्याचा दरवाजा अज्ञाताने  6-8 एप्रिल दरम्यान तोडुन घरातील स्वयपांक घर व  बैठक घराचा दरवाजाचा कडी-कोंडा तोडुन कपाटातील 50,000 रु. रोख रक्कम व मेज पंखा चोरुन नेला. अशा मजकुराच्या श्रीगणेश लोमटे यांनी दि. 09 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

    फसवणूक 

 उमरगा : कोराळ, ता. उमरगा येथील अरुण विठठल सुरवसे, हे 2 एप्रिल रोजी उमरगा येथील एका एटीएम केंद्रातुन पैसे काढल्यानंतर ते कार्ड  यंत्रातच ठेउन पैसे मोजत होते. ही संधी साधुन बाजुस उभ्या असलेल्या अज्ञात पुरुषाने त्यांचे एटीएम कार्ड काढुन घेउन त्या जागी त्याच बँकेच, तशाच रंगसंगतीचे हुसेन बिसमिल्ला नावाचे कार्ड ठेवले. यावेळी सुरवसे यांचा पासवर्ड ही त्या अज्ञाताने बघितला होता.  

पैसे मोजुन झाल्यावर सुरवसे यांनी एटीएम यंत्रातुन एटीएम कार्ड काढले. परंतु त्या कार्डवरील ग्राहकाचे नाव वाचुन कार्ड आपले असल्याची खात्री केली नाही. यानंतर त्या भामटयाने अरुण सुरवसे यांच्या बँक खात्यातील 75,000 रु. रक्कम वेगवेगळया एटीएम केंद्रातुन काढली. रक्कम काढल्याचे संदेश सुरवसे यांच्या भ्रमणध्वनीवर येत होते. परंतु ते संदेश सुरवसे यांनी तात्काळ वाचले नाहीत. कालांतराने खात्यातील 75,000 रु. रक्कम लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी उमरगा पो. ठा. गाठुन दि. 09 एप्रिल रोजी गुन्हयाची प्रथम खबर भा. दं. सं. कलम 420 अंतर्गत नोंदवली आहे.

From around the web