उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या चार घटना 

 

 तुळजापूर: एकात्मीक बालविकास प्रकल्प, तुळजापूर येथे कर्तव्यास असलेल्या जयश्री वसंतराव घुगे या दि. 02.02.2021 रोजी 16.00 वा. सु. आपल्या कार्यालयीन टेबलवर भ्रमणध्वनी ठेवून वरिष्ठांकडे गेल्या. त्या 16.30 वा. सु. परत आल्या असता तो भ्रमणध्वनी ठेवल्या ठिकाणी न आढळल्याने तो अज्ञाताने चोरुन नेला असावा. अशा मजकुराच्या जयश्री घुगे यांनी 29 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : ऋतुजा प्रताप देशमुख, रा. खासापुरी, ता. परंडा या 29 मार्च रोजी 12.30 वा. सु. उस्मानाबाद बसस्थानकात परंडा बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेउन अज्ञाताने त्यांच्या पर्समधील स्मार्टफोन चोरुन नेला. अशा मजकुराच्या ऋतुजा देशमुख यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 येरमाळा: हेमंत सुनिल शिनगारे, रा. शेलगांव, ता. कळंब यांनी त्यांच्या घरासमोर लावलेला ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एच 6807 व त्यासह ट्रॅक्टरची महत्त्वाची कागदपत्रे अज्ञात व्यक्तीने 25- 26 मार्च दरम्यानच्या रात्री चोरुन नेली.

            दुसऱ्या घटनेत ज्ञानेश्वर लालासाहेब उगले, रा. सातेफळ, ता. कळंब यांच्या घरासमोरील ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 ए 0395 व अन्य एका ट्रॅक्टरच्या एक्साईड एक्सप्रेस बॅटऱ्या 2 नग 25- 26 मार्च दरम्यानच्या रात्री अज्ञात चालकाने वाहन क्र. एम.एच. 20 बीसी 0830 मधून चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या हेमंत शिनगारे व ज्ञानेश्वर उगले या दोघांनी दि. 29 मार्च रोजी दिलेल्या स्वतंत्र 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

फसवणूक

 ढोकी: विमलचंद्र रामचंद्र जोशी, रा. तेर, ता. उस्मानाबाद यांनी एका व्यक्तीस युपीआय ॲपद्वारे 1,865 ₹ पाठवले होते. त्या व्यवहारात तांत्रीक अडचण आल्याने त्यांनी इंटरनेटवरुन ग्राहक सेवा केंद्राचा संपर्क क्रमांक मिळवून त्यावर 19 मार्च रोजी संपर्क साधला. यावर समोरील व्यक्तीने त्यांना मोबाईलवर ॲपलिकेशन घेण्यास सांगून त्यात आपली व्यक्तीगत बँकींग माहिती भरण्यास सांगीतले. यावर विमलचंद्र जोशी यांनी तसे केले असता तीन व्यवहारांत अनुक्रमे 10,611 ₹ 36,210 ₹ व 36,210 ₹ अशी एकुण 83,031 ₹ रक्कम जोशी यांच्या बँक खात्यातून अन्यत्र स्थलांतरीत झाली. अशा मजकुराच्या विमलचंद्र जोशी यांनी 29 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (सी) व (डी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web