उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या चार घटना 

 

परंडा: वाकडी, ता. परंडा येथील भगवान बिरमल कारभारी यांच्या वाकडी गट क्र. 179 मधील शेतात बांधलेलेल्या दोन जर्सी गाई अज्ञाताने 01- 02 मार्च रोजी दरम्यानच्या रात्री चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या भगवान कारभारी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत कुंभेफळ, ता. परंडा येथील अमोल बापुराव कोढुळे यांनी त्यांची हिरो होंडा एचपी डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएफ 3580 ही 08 मार्च रोजी 10.00 वा. सु. कुंभेफळ येथील जयमल्हार हॉटेल समोर लावली होती. ती त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी लावलेल्या ठिकाणी न आढळल्याने ती अज्ञाताने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या अमोल कोढुळे यांनी 10 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उस्मानाबाद -   बिलालनगर, उस्मानाबाद येथील हुजूर शमाशिर शेख यांच्या घरासमोरील त्यांची हिरो होंडा पॅशन प्रो मोटारसायकल क्र. एम.एच. 25 व्ही 0526 व त्यांच्या मित्राची हिरो होंडा पॅशन प्लस मो.सा. क्र. एम.एच. 13 एक्यु 1220 अशा दोन मो.सा. 08- 09 मार्च दरम्यानच्या रात्री अज्ञाताने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या हुजूर शेख यांनी 10 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद -  आंबेजवळगा, ता. उस्मानाबाद येथील आण्णा गणपत रेवले यांनी 09-10 मार्च दरम्यानच्या रात्री आपल्या घराचे दार उघडे ठेवून झोपले होते. घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून अज्ञाताने घरातील कपाटात असलेले 1,00,000 ₹ चोरुन नेले. अशा मजकुराच्या आण्णा रेवले यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

डेबिट कार्ड क्लोनींग करून फसवणूक

उस्मानाबाद - उस्मानाबाद येथील रेखा खोत यांच्या डेबिट कार्ड सारखेच (क्लोनींग) डेबिट कार्ड अज्ञात व्यक्तीने तयार करून त्याचा पासवर्ड हस्तगत करुन दि. 05.02.2021 रोजी स्टेट बँक ऑफ इंडीया, उस्मानाबाद येथील खोत यांच्या बॅक खात्यातील 20,000 ₹ रक्कम एटीएम मशीनद्वारे काढून त्यांची फसवणूक केली. अशा मजकुराच्या रेखा खोत यांनी 10 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (सी) (डी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web