उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या चार घटना 

 

उस्मानाबाद  : जितेंद्र  ननवरे. रा.दत्तनगर, उस्मानाबाद  यांनी त्यांची स्प्लेन्‍डर प्रो  मोटार सायकल क्र एमएच 25 एएक्स 2653 ही  दि.11.01.2021 रोजी  23.45 वा सु घरासमोर लावली होती. ती दुस-या दिवशी जागेवर आढळली नाही. यावरुन ती अज्ञात चोरटयाने चोरली आहे.अशा मजकुराच्या ननवरे यांनी दि.13.01.2021 रोजी  दिलेल्या प्रथम खबरेवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध भा.दं.सं. कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

आंबी : दिपक कोरे,रा.इंदापुर. ता.वाशी यांनी त्यांची बजाज डिस्कव्हर   मोटार सायकल क्र एमएच 25 डब्ल्यु 1824 ही  दि.12.01.2021 रोजी  21.00 वा सु नळीफाटा येथील हॉटेल साई समोर लावलेली होती. ती दुस-या दिवशी सायंकाळी 18.00 वा जागेवर आढळली नाही. यावरुन ती अज्ञात चोरटयाने चोरली आहे.अशा मजकुराच्या कोरे यांनी दि.13.01.2021 रोजी  दिलेल्या प्रथम खबरेवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध भा.दं.सं. कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

 बेंबळी : सागर गिरवलकर,रा.बेंबळी  यांच्या आंबेवाडी शिवारातील गट क्र 54 मधील शेत तळयातील ॲक्वाटेक्स कंपनीची 3 अश्वशक्ती क्षमतेचा पानबुडी विदयुत पंप हा   दि.12  ते 13 .01.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात चोरटयाने चोरला.अशा मजकुराच्या सागर गिरवलकर यांनी दि.13.01.2021 रोजी  दिलेल्या प्रथम खबरेवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध भा.दं.सं. कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

शिराढोण  : दत्तात्रय शेळके.रा.खामसवाडी ता.कळंब यांच्या घरासह शेजारील अन्य 5 घरांच्या दरवाजाचे कुलूप दि.12 ते 13 .01.2021  दरम्यानच्या रात्री अज्ञात चोरटयाने तोडुन सर्व घरातील सोने - चांदीचे  दागीने व रोख रक्कम असा एकुण 5,67,727 रु चा ऐवज चोरुन नेला. अशा मजकुराच्या दत्तात्रय शेळके यांनी दि.13.01.2021 रोजी  दिलेल्या प्रथम खबरेवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध भा.दं.सं. कलम 457,380 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

From around the web