नळदुर्ग,तामलवाडी, ढोकी येथील शेतातील चार विद्युत पंप चोरीस

 
Osmanabad police

तामलवाडी: बळीराम भिल्लु जाधव, रा. खडकी, ता. तुळजापूर यांच्या खडकी गट क्र. 119 मधील शेत विहीरीतील सीएस कंपनीचा 3 अश्वशक्ती क्षमतेचा विद्युत पंप दि. 22.05.2021 रोजीच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. तर दुसऱ्या घटनेत गणेश रुपसिंग मनसावाले, रा. खडकी यांच्या खडकी शिवारातील शेत विहीरीतील शार्प कंपनीचा 5 अश्वशक्ती क्षमतेचा पानबुडी विद्युत पंप दि. 05- 09.05.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला.

अशा मजकुराच्या बळीराम जाधव व गणेश मनसावाले यांनी दि. 23 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

 
 ढोकी: ओम विठ्ठल काटे, रा. जवळे (दु.), ता. उस्मानाबाद यांच्या जवळे (दु.) गट क्र. 81 मधील शेतातील एमटेक कंपनीचा 5 अश्वशक्ती क्षमतेचा पानबुडी विद्युत पंप व 600 फुट वायर दि. 22- 23.05.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या ओम काटे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग: हरिदास बब्रुवान जाधव, रा. शिरगापुर, ता. तुळजापूर यांच्या शिरगापुर गट क्र. 62 मधील शेत विहीरीतील लक्ष्मी कंपनीचा 5 अश्वशक्ती क्षमतेचा विद्युत पंप दि. 22- 23.05.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या हरिदास जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web