उस्मानाबाद जिल्ह्यात चार गुन्ह्यातील चार आरोपींना आर्थिक दंडाची शिक्षा

 

 उमरगा: कोविड- 19 संबंधी प्रशासनाचे मनाई आदेश झुगारुन 28 मार्च रोजी जनता कर्फ्यु दरम्यान भा.दं.सं. कलम- 188, 269 चे उल्लंघन केल्या प्रकरणी संजय बाबुराव हंचाटे व शिवाजी मंमाळे, दोघे रा. उमरगा यांना अनुक्रमे 400 ₹ 1,000₹  दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उमरगा यांनी 30 मार्च रोजी सुनावली आहे.

भुम: प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, भुम यांनी 2 गुन्ह्यातील 2 व्यक्तींस आर्थिक दंडाच्या शिक्षा सुनावल्या आहेत.

सागर राजेंद्र चंदनशिवे यांनी मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा निष्काळजीपणे सार्वजनिक रस्त्यावरील हातगाड्यात अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केल्याने त्यांना 500 ₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.

जिवन भिमराव मासाळ यांनी मानवी जिवीतास व रहदारीस अडथळा होईल अशा निष्काळजीपणे सार्वजनिक रस्त्यावर वाहन उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्या प्रकरणी त्यांना 200 ₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.

उस्मानाबाद -  कोविड- 19 च्या पर्श्वभुमीवर लोकसेवकाने जारी केलेले विविध मनाई आदेश झुगारुन भा.दं.सं. कलम- 269 चे उल्लंघन करणाऱ्या एका व्यक्तीस 500 ₹  दंड व दंड न भरल्यास 3 दिवस साध्या कारावासाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी 30 मार्च रोजी सुनावली आहे.

From around the web