उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखल 

 

लोहारा: जनार्धन जावळे, रा. नागुर हे  5 एप्रिल रोजी 21.30 वाजता घरात होते. यावेळी जुन्या वादातुन गावकरी- दिनकर व विनोद पाटील या पिता-पुत्रांसह तानाजी व प्रशांत पाटील यांनी जनार्धन यांच्या  घरात घुसुन जनार्धन यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी  मारहाण केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या जनार्धन जावळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. दं. सं. कलम- 452, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा: बाळासाहेब लक्ष्मण बोटे, रा. देवळाली, ता. भुम हे  4 एप्रिल रोजी 22.00 वाजता घरासमोर होते. यावेळी गटाराचे पाणी साचल्याच्या वादातुन भाउबंद- अंकुश, दिगंबर, सोमेश्वर बोटे यांनी बाळासाहेब यांना  शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने  मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. बाळासाहेब यांच्या पत्नी –महादेवी, वडील-लक्ष्मण यांनी भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बाळासाहेब बोटे यांनी वैदयकीय उपचारा दरम्यान दिलेल्या निवेदना वरुन भा. दं. सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 येरमाळा: मसा लिंबा मुळे, रा. उपळाई, ता. कळंब हे  6 एप्रिल रोजी 11.00 वाजता संजितपुर शिवारातील शेतात होते. यावेळी सापनाई येथील ग्रामस्थ्‍- अक्षय व दत्ता मुळे, आप्पा दळवे यांनी जमीन वाटपाच्या वादातुन मसा मुळे यांना  शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने  मारहाण केली. मसा मुळे यांची पत्नी –सत्यभामा, सुन- वैशाली यांनी मसा मुळे यांच्या बचावाचा प्रयत्न केला असता त्यांनाही शिवीगाळ करुन दगडाने मारहाण केली. अशा मजकुराच्या मसा मुळे यांनी दिलेल्या प्रथम खबरे वरुन भा. दं. सं. कलम- 324, 323, 504,  34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी: परशुराम व हणुमंत वाकडे, रा. तडवळे (कसबे), ता. उस्मानाबाद हे दोघे भाउ 4 एप्रिल रोजी 16.30 वाजता गाव शिवारातील शेतात होते. यावेळी भाउबंद-कांताबाई, बालिका, विजय, दादा, राजाभाउ  यांनी शेत बांध दुरुस्तीच्या वादातुन परशुराम व हणुमंत यांना  शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी व काठीने  मारहाण केली. अशा मजकुराच्या परशुराम यांनी दिलेल्या प्रथम खबरे वरुन भा. दं. सं. कलम- 324, 323, 504,  143, 147, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web