उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखल 

 

परंडा: शेकापुर, ता. भुम येथील उमेश विनायक गोरे यांसह 3 कुटूंबीय व सलमान अजिज पठाण यांसह 3 कुटूंबीय अशा दोन्ही कुटूंबाचा 27 मार्च रोजी 19.00 वा. सु. शेत रस्त्यावरुन रहदारीच्या कारणावरुन शेकापुर शेत शिवारात वाद उद्भवला. यात दोन्ही कुटूंबातील सदस्यांनी परस्परविरोधी कुटूंबीयांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी टामी, दगड, खोऱ्याने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या उमेश गोरे व सलमान पठाण यांनी परस्परविरोधी दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

तामलवाडी: सुरेखा संदीपान कदम व त्यांचा नातू- अभिराज वडणे यांनी आपल्या कोंबड्यास दगड मारल्याचा जाब 28 मार्च रोजी 12.00 वा. सु. राहत्या गल्लीत भाऊबंद- बालाजी कदम व सरस्वती कदम यांना विचारला असता त्यांनी सुरेखा कदम व अभिराज यांना शिवीगाळ करुन दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या सुरेखा कदम यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 तुळजापूर: वडर गल्ली, तुळजापूर येथील गोकुळ , सुरज, नकुलाबाई, संतोष या पवार कुटूंबीयांनी “तुझा भाडेकरुन आमच्या येण्या-जाण्याच्या रस्त्यावर होळी का पेटवतो.” या कारणावरुन  28 मार्च रोजी 20.00 वा. सु. वडर गल्लीत गावकरी- राजाभाऊ रामचंद्र व्हटकर यांना काठीने, विटाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या राजाभाऊ व्हटकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद - आसिफाबेगम सय्यद, रा. गालीबनगर, उस्मानाबाद यांच्या मालकीच्या गट क्र. 118/9 मधील भुखंड क्र. 10 वर 28 मार्च रोजी 12.30 वा. सु.  नातेवाईक- बुरहाण सय्यद, फैजान सय्यद हे दोघे बांबु रोवत असतांना आसिफाबेगम यांनी त्याचा जाब त्या दोघांना विचारला असता त्यांनी आसिफाबेगम यांना शिवीगाळ करुन दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या आसिफाबेगम सय्यद यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

विनयभंग

उस्मानाबाद -  जिल्ह्यातील एका गावातील एक 27 वर्षीय महिला (नाव- गाव गोपनीय) 27 मार्च रोजी 12.00 वा. सु. पाणी आणण्यासाठी घराबाहेर पडली असता गल्लीतीलच एका कुटूंबीयांनी त्या महिलेस लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले. मारहाणी दरम्यान त्यातील एका पुरुषाने महिलेसोबत अश्लील वर्तन व हावभाव करुन तीचा विनयभंग केला. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने 28 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354, 324, 323, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web