उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखल 

 
उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखल

लोहारा: कानेगाव, ता. लोहारा येथील बब्रुवान नारायण क्षिरसागर हे 10 मार्च रोजी 15.00 वा. गावातील आपल्या शेतात होते. यावेळी गावकरी- गोविंद, हनुमंत, मधुकर, शिवराम या भारती कुटूंबीयांनी तेथे येउन बब्रुवान क्षिरसागर यांचे शेत नांगरण्यास सुरवात केली असता त्यांचा जाब बब्रुवान यांनी नमूद चौघांना विचारला असता त्यांनी बब्रुवान यांना “हे आमचेच शेत आहे.” असे धमकावून शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या बब्रुवान क्षिरसागर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 परंडा: हनुमंत मनोहर लोकरे, रा. पिंपळवाडी, ता. परंडा हे 09 मार्च रोजी आसु गट क्र. 202 मधील शेतात पिकास पाणी देत होते. यावेळी राजकीय वैमनस्यातून गावकरी- धनंजय कांबळे, लक्ष्मण कांबळे, दत्तात्रय कांबळे, अदित्य कांबळे व राहुल लोकरे अशा पाच जणांनी हनुमंत लोकरे यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी देउन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या हनुमंत लोकरे यांनी 10 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 143, 147, 148, 506, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद - संजय सुभाष मालखरे, रा. औरंगाबाद हे 10 मार्च रोजी 12.30 वा. सु. राघुचीवाडी येथील शेतात पिकाची मळणी करत होते. त्या शेताचे प्रकरण न्यायालयात चालू असल्याने न्यायालयाने त्या शेतात जाण्याचा मनाई आदेश जारी केला असतांना उस्मानाबाद येथील भास्कर सुग्रीव यादव व सत्यजीत भारत यादव यांनी तो मनाई आदेश डावलून त्या शेतात गेले व संजय मालखरे यांच्या शेतकामात अडथळा निर्माण करुन त्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संजय मालखरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 उस्मानाबाद - तुकाराम साळुंके, अनिल साळुंके व अन्य एक व्यक्ती, तीघे रा. वासुदेव गल्लीजवळ, उस्मानाबाद यांसह विजय काकडे अशा चौघांनी विज जोडणीच्या कारणावरुन 08 मार्च रोजी 18.00 वा. सु. वासुदेव गल्ली येथे गल्लीतीलच- अरुण शंकर राउत यांसह त्यांची पत्नी, दोन मुली यांना शिवीगाळ करुन काठी, दगड, कत्तीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या अरुण राउत यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                   

From around the web