उस्मानाबाद जिल्ह्यात चार अपघात, दोन ठार, चार जखमी 

 

मुरुम: नाईकनगर (सु.), ता. उमरगा येथील उमेश पांडुरंग पवार हे दि. 28.02.2021 रोजी 20.30 वा. सु. उमरगा- मुरुम असा मोटारसायकलने प्रवास करत होते. दरम्यान भुसणी शिवारातील रस्त्यावर अज्ञात चालकाने मोटारसायकल निष्काळजीपणे, हयगईने चालवून उमेश पवार यांच्या मोटारसायकलला पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या उमेश पवार यांनी 26 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा: बोरी, ता. उमरगा येथील भालचंद्र रावसाहेब मुळजे यांनी 19 मार्च रोजी 12.30 वा. सु. बाबळसुर शिवारातील राज्य महामार्ग क्र. 164 वर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एसी 1959 ही निष्काळजीपणे, हयगईने चालवल्याने ती अनियंत्रीत होउन रस्त्याबाजूच्या खड्ड्यात जाउन पडली. या अपघातात भालचंद्र मुळजे हे गंभीर जखमी होउन उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा पुतण्या- महेश दयानंद मुळजे यांनी 26 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद -  चालक- राम हणुमंत शेंडगे, रा. उत्तमी (कायापुर), ता. उसमानाबाद हे 26 मार्च रोजी 13.00 वा. सु. उस्मानाबाद शहरातील बेंबळी कॉर्नर येथील रस्त्याने ऑटोरीक्षा क्र. 25 एके 0640 हा चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने विना नोंदणीक्रमांची मोटारसायकल निष्काळजीपणे चालवून राम शेंडगे यांच्या ऑटोरीक्षास समोरुन धडक दिली. या अपघातात राम शेंडगे यांसह ऑटोरीक्षातील प्रवासी किरकोळ व गंभीर जखमी होउन अज्ञात मोटारसायकलस्वार हा स्वत: ही जखमी झाला. अशा मजकुराच्या राम शेंडगे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी: योगीता गणेश शिराळ, रा. पाडोळी (आ.), ता. उस्मानाबाद या 25 मार्च रोजी शेतात ट्रॅक्टर चालवत असतांना त्यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून ट्रॅक्टर शेजारील पत्रा शेडला धडकला. या अपघातात प्रतिभा या गंभीर जखमी होउन मयत झाल्या. अशा मजकुराच्या प्रतिभा विरभद्र शिराळ यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 304 (अ) अंतर्गत गुना नोंदवला आहे.

From around the web