ढोकी, एकोंडीवाडी येथे हाणामारी, पाच जखमी 

 
ढोकी, एकोंडीवाडी येथे हाणामारी, पाच जखमी

 उमरगा: सुधाकर तुकाराम जाधव, रा. उमरगा यांनी दिनेश पाटील, रा. एकोंडीवाडी, ता. उमरगा यांना स्लायडींगचे काम दिले असुन दिनेश पाटील यांनी ते काम पुर्ण केले नसल्याने त्याचा जाब सुधाकर जाधव यांनी दिनेश यांना विचारला असता चिडुन जाउन दिनेश यांसह एक अनोळखी व्यक्ती या दोघांनी सुधाकर जाधव यांना शिवीगाळ करुन, ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, काठीने, चप्पलने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या सुधाकर जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 ढोकी: पारधी पिढी, ढोकी, ता. उस्मानाबाद येथील 1)राजा चव्हाण 2)बब्रुवान चव्हाण 3)अशोक चव्हाण 4)नवताजी चव्हाण 5)बबल्या चव्हाण या सर्वांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन 27 एप्रील रोजी 16.30 वा. सु. सटवाई पारधी विढी, ढोकी येथे सुनिता काळे, बबन काळे, विकास काळे व गिता काळे, सर्व रा. क्रांतीनगर, केज अशा चौघांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या सुनिता काळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 269, 188 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरी

 परंडा: मुजम्मील नसीम पटेल, रा. गारभवानी नगर, परंडा यांनी आपली हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल एम.एच. 13सीएफ 1711 ही दि. 18 एप्रील रोजी 20.00 वा. सु. राहत्या घरासमोर ठेवली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 08.00 वा. सु. त्यांना ती ठेवल्या जागी न आढळल्याने ती अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली असावी. अशा मजकुराच्या मुजम्मील पटेल यांनी दि. 28 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web