उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या पाच घटना 

 
उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या पाच घटना

ढोकी -  फंड गल्ली, तेर येथील ‘श्री समर्थ कलेक्शन’ च्या पाठीमागील गेटचे गज अज्ञात व्यक्तीने 12 मार्च रोजीच्या रात्री तोडून आतील साड्या 40 नग, विजार 45 नग, लहान मुलांचे कपडे 25 नग, टी-शर्ट 80 नग व 1,000 ₹ रोख रक्कम असा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या दुकान मालक- रमेश बाजीराव फंड, रा. तेर यांनी 13 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद -  येडशी, ता. उस्मानाबाद येथील चंद्रकांत रामलिंग शिंदे यांनी आपली बजाज डिस्कव्हर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एसी 1277 ही 08 मार्च रोजी 22.00 वा. सु. राहत्या घरासमोर ठेवली होती. दुसऱ्या दिवशी सकाही ती त्यांना ठेवल्याजागी न आढळल्याने ती अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या चंद्रकांत शिंदे यांनी 13 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 येरमाळा: तेरखेडा, ता. वाशी येथील रोहित तुकाराम घुले यांनी त्यांच्या ताब्यातील हिरो पॅशन प्रो मोटारसायकल क्र. एम.एच. 25 डब्लु 4462 ही 11 मार्च रोजी रात्री राहत्या घरासमोर ठेवली होती. दुसऱ्या दिवशी सकाही ती त्यांना ठेवल्याजागी न आढळल्याने ती अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या रोहित घुले यांनी 13 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी: तपोवन, वाशी येथील उषा ननवरे यांच्यासह शेजारी- ज्ञानदेव मस्कर यांच्या बंद घराचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने 13 मार्च रोजी रात्री 02.45 वा. उचकटून घरातील 2,90,000 ₹ किंमतीचे सुवर्ण दागिने व 40,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या उषा ननवरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            यशवंडी, ता. वाशी येथील बिभीषण काळे यांनी आपल्या घरासमोर लावलेली हिरो एचएफ डिलक्स मो.सा. क्र. एम.एच. 25 एआर 6396 ही अज्ञाताने 11- 12 मार्च दरम्यानच्या रात्री चोरुन नेली.  अशा मजकुराच्या बिभीषण काळे यांनी 13 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web