सापनाई रस्ता लुटमारीतील रकमेसह पाच आरोपी 48 तासांत ताब्यात

 

उस्मानाबाद  - व्यापाऱ्यास विकलेल्या हरभऱ्याची 2,61,000 ₹ रक्कम घेउन विजय चंद्रकांत भोरे रा. सापनाई, ता. कळंब हे 18 मार्च रोजी 00.15 वा. सु पिकअप वाहन क्र. एम.एच. 25 पी 5514 मधून घरी परतत असतांना सापनाई -दहिफळ रस्त्यावर एका पॅशन प्रो मोटारसायकलवर आलेल्या अनोळखी पुरुषांनी नमूद पिकअप वाहन आडवून अंगावर थुकल्याचा बहाना करुन विजय भोरे व पिकअप चालक यांना गाडी बाहेर ओढून लोखंडी गजाचा धाक दाखवून विजय भोरे यांच्याजवळील नमूद रक्कम व चालकासह दोघांचे स्मार्टफोन हिसकावून पसार झाले होते. यावरुन येरमाळा पो.ठा. येथे गु.र.क्र. 40 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 392, 341, 34 प्रमाणे दाखल आहे.

            गुन्हा तपासात उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री विशाल खांबे व स्था.गु.शा. च्या पोनि- श्री गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली येरमाळा पो.ठा. चे सपोनि- गणेश मुंडे, पोउपनि- श्री राडकर यांसह पथकाने व स्था.गु.शा. चे पोउपनि- श्री पांडुरंग माने, पोना- हुसेन सय्यद, पोकॉ- अविनाश मरलापल्ले, आरसेवाड यांच्या संयुक्त पथकाने नमूद गुन्ह्याचा विश्लेषनात्मक तपास करुन व खबऱ्यांद्वारे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नमूद लुटीच्या मालापैकी 60,000 ₹ रक्कमेसह 1)साहिल जब्बार शेख, वय 19 वर्षे 2)आमदार अब्दुलरहीम शेख, वय 27 वर्षे 3)सलमान दस्तगीर पठाण, वय 21 वर्षे, तीघे रा. भूम यांना आज 21 मार्च रोजी भूम शहरातून ताब्यात घेउन गुन्ह्यातील त्यांचे अन्य दोन साथीदार 4)विक्रम भाउराव डोके, वय 23 वर्षे 5)कैलास अर्जुन कोंदे, वय 23 वर्षे, दोघे रा. सापनाई, ता. कळंब यांना ताब्यात घेतले असून गुन्ह्याचा उर्वरीत तपास येरमाळा पोलीस करत आहेत.

सार्वजनिक ठिकाणी धोकादायकपणे वाहन चालवणाऱ्या व उभे करणाऱ्या चालकांवर गुन्हे दाखल

सार्वजनिक ठिकाणी रहदारीस धोका निर्माण होईल, मानवी जिवीतास धोका होईल अशा प्रकारे वाहन उभे करुन, निष्काळजीपणे वाहन चालवून भा.दं.सं. कलम- 283, 279 चे उल्लंघन करणाऱ्या 5 वाहन चालकांवर 5 गुन्हे  20 मार्च रोजी दाखल करण्यात आले.

1) बालाजी डांगे, रा. तिर्थ (खुर्द) व मोहन धुरगुडे, रा. रायखेल, ता. तुळजापूर या दोघांनी आपापल्या ताब्यातील अनुक्रमे ऑटोरीक्षा क्र. एम.एच. 25 एफ 1153 व ऑटोरीक्षा क्र. एम.एच. 25 एके 0781 अशी दोन वाहने जुने बसस्थानक तुळजापूर येथील रस्त्यावर निष्काळजीपणे, धोकादायकरित्या उभे केले असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले.

2) आयाज पठाण, रा. पेठसांगवी, ता. उमरगा यांनी आपला ट्रक क्र. एम.एच. 19 जे 3990 हा तामलवाडी येथील राष्ट्रीय महामार्गावर निष्काळजीपणे, धोकादायकरित्या उभा केला तर समीर चौधरी, रा. सोलापूर यांनी आपला ट्रक क्र. एम.एच. 25 बी 9817 हा तामलवाडी येथील महामार्गावर बेदरकारपणे, हयगईने चालवला असल्याचे तामलवाडी पो.ठा. च्या पथकास आढळले.

3) बालाजी डांगे, रा. तिर्थ (खुर्द) यांनी हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 13 बीवाय 4671 ही परंडा येथील सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपणे, धोकादायकरित्या उभी केली असतांना परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले.

सार्वजनिक ठिकाणी गाड्यावर निष्काळजीपणे अग्नी प्रज्वलीत करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद येथील शहादुल्ला थोडगे यांनी 20 मार्च रोजी उस्मानाबाद येथील आयुर्वेदीक महाविद्यालयासमोरील रस्त्यावर तर सिद्राम कुंभार, रा. उमरगा यांनी 20 मार्च रोजी उमरगा बसस्थानक समोरील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर आपापल्या हातगाड्यांवर अग्नी प्रज्वलीत करुन मानवी जिवीतास धोका निर्माण होईल असे निष्काळजीपणाचे कृत्य केले.

 यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द उस्मानाबाद (श.) व उमरगा पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 285 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web