कोविड- 19 संबंधी मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

 
कोविड- 19 संबंधी मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद  - मानवी जिवीतास, रहदारीस धोका होईल अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणे वाहन उभे करणाऱ्या, सार्वजनिक ठिकाणी हातगाड्यावर अग्नी प्रज्वलीत करणाऱ्या, कोविड- 19 च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने जारी केलेले विविध मनाई आदेश झुगारुन दुकान- हॉटेल व्यवसायासाठी चालू ठेवणाऱ्यांवर  उस्मानाबाद जिल्हा पोलीसांनी संबंधीत पो.ठा. येथे 02 एप्रील रोजी खालील प्रमाणे गुन्हे दाखल केले.

 
 तामलवाडी : अलिम पिरजादे यांनी 04 एप्रील रोजी 13.00 वा. तामलवाडी येथे जनता कर्फयुचे उल्लंघन करुन किराणा दुकान व्यवसायास चालू ठेवुन  कोविड- 19 संसर्गाची शक्यता निर्माण करण्याची घातक कृती करुन भा.दं.सं. कलम- 188, 269 उल्लंघन केले.

 आंबी : मनोज गायकवाड रा.शेळगाव ता.परंडा यांनी 04 एप्रील रोजी 20.00 वा. शेळगाव  येथे जनता कर्फयुचे उल्लंघन करुन चहा हॉटेल व्यवसायास चालू ठेवुन  कोविड- 19 संसर्गाची शक्यता निर्माण करण्याची घातक कृती करुन भा.दं.सं. कलम- 188, 269 चे उल्लंघन केले.

 शिराढोण : अमोल वाघमारे, रा. शिराढोण  यांनी 04 एप्रील रोजी 20.20 वा. जनता कर्फयुचे उल्लंघन करुन शिराढोण येथील ग्राहक सेवा केंद्र  व्यवसायास चालू ठेवुन  कोविड- 19 संसर्गाची शक्यता निर्माण करण्याची घातक कृती करुन भा.दं.सं. कलम- 188, 269 चे उल्लंघन केले.

 उस्मानाबाद - : बळीराम पाटील यांनी 04 एप्रील रोजी 12.50 वा. आळणी फाटा येथील खानावळीत मानवी जिवीतास धोका होईल अशा निष्काळजीपणे अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकार तर्फे दिलेल्या  प्रथम खबरेवरुन  भा.दं.सं. कलम-285 अंतर्गत  गुन्हा नोंदवला आहे.

From around the web