कोविड उपचार केंद्रात अनाधिकृत प्रवेश करुन निष्काळजीपणाचे कृत्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

आंबी: भक्त निवास, सोनारी, ता. परंडा येथील कोविड उपचार केंद्रात दि. 22 मे रोजी 14.00 वा. सु. गावकरी- रविकीरण लोखंडे यांनी अनाधिकृतपणे प्रवेश केला. तसेच कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर कोणत्याही प्रकारची खबरदारी न घेता आतील रुग्णांची तपासणी केली. 

अशा प्रकारे त्यांनी निष्काळजीपणाची कृती करुन कोविड- 19 च्या संक्रमणाची शक्यता निर्माण केली. यावरुन अनाळा, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी- श्रीमती अमृता भांडवलकर यांनी दि. 23 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 448, 270 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


मनाई आदेश झुगारुन दुकान, हॉटेल चालू ठेवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

उस्मानाबाद -  कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्या आदेशाने जिल्ह्यात विविध मनाई आदेश लागू आहे. असे असतांनाही ते मनाई आदेश झुगारुन 1)उत्तम श्रीमंत शिंदे, रा. उस्मानाबाद यांनी दि. 23 मे रोजी 16.20 वा. सु. बार्शी नाका, उस्मानाबाद येथील आपले किराणा दुकान चालू ठेउन व्यवसाय केला. तसेच 2)युवराज अर्जुन माळी, रा. काटगाव, ता. तुळजापूर 3)नागेश दत्तात्रय माने, रा. तुळजापूर या दोघांनी याच दिवशी 10.50 वा. सु. तुळजापूर येथील नळदुर्ग रस्त्यालगतचे आपापले अनुक्रमे ‘अजय टि हाऊस’ व ‘सौदागर कॅन्टीन’ हे व्यवसाय चालू ठेउन ग्राहकांची गर्दी जमवून व्यवसाय केला.

            अशा प्रकारे नमूद तीघांनी जिल्हाधिकारी यांचे मनाई आदेश डावलून व कोविड- 19 संसर्गाच्या शक्यतेची निष्काळजीपणाची कृती करुन भा.दं.सं. कलम- 188, 269, 270 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीघांविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web