प्राण्यांची निर्दयतेने वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
s

तुळजापूर: अरीफ आसीफ सय्यद, रा. नेहरु नगर, उस्मानाबाद हे दि. 03.05.2021 रोजी 13.00 वा. सु. तुळजापूर- सोलापूर रस्तावरील सांगवी मार्डी शिवारात अशोक लेलँड दोस्त वाहन क्र. एम.एच. 25 पी 5525 मध्ये एक गाय, दोन वासरे व दोन म्हशीची रेडके अशी 5 जनावरे दाटीवाटीने भरुन त्यांच्या चारापाण्याची कोणतीही व्यवस्था न करता निर्दयतेने वाहतुक करत असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन तुळजापूर पो.ठा. चे पोलीस अंमलदार- जयप्रकाश गलांडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन सय्यद यांच्याविरुध्द प्राण्यांना क्रुरतेने वागणुकीस प्रतिबंध कायदा कलम- 11 (1) (ए) (डी) (एच) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 119 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाई

लोहारा: सुशांत बबन मोरे, रा. नागूर, ता. लोहारा हे 03 मे रोजी नागूर शिवारातील तलावाजवळ अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 16 बाटल्या (किं.अं. 1,280 ₹) बाळगलेले असतांना लोहारा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध दारु जप्त करुन नमूद आरोपीविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web