निलेगाव ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण  करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 

नळदुर्ग: तुळजापूर तालुक्यातील निलेगाव ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा टाकी व विंधन विहीरीच्या जागेवर गावकरी- सैफन मोहम्मद शेख यांनी 11 मार्च रोजी 11.00 वा. अतिक्रमन करुन जागेस कुंपन करुन पाणी भरण्यास गावकऱ्यांना विरोध केला. अशा मजकुराच्या ग्रामविकास अधिकारी- श्री संजय माशाळे यांनी 15 मार्च रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 447 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
चोरी

 उमरगा: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उमरगा तालुक्यातील नारंगवाडी शाखेच्या भिंतीला अज्ञात व्यक्तीने 12- 15 मार्च रोजी दरम्यान भगदाड पाडून बँकेतील तिजोरी गॅसकटरच्या सहाय्याने कापून आतील 4,06,920 ₹रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या बँक व्यवस्थापक- श्री बालाजी रामराव पवार, रा. नाईचाकुर, ता. उमरगा यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 457, 380, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपघात

 नळदुर्ग: चालक- महेश थावरु राठोड, रा. अचलेर तांडा, ता. लोहारा यांनी 14 मार्च रोजी 07.30 वा. सु. नळदुर्ग येथील सितारा हॉटेल समोरील रस्ता वळणावर ट्रक क्र. के.ए. 25 डी 0858 ही निष्काळजीपणे चालवल्याने मो.सा. क्र. एम.एच. 25 डब्लू 9204 ला समोरुन धडक बसली. या अपघातात मो.सा. चालक- ईब्राहीम काशीद सय्यद, वय 73 वर्षे, रा. व्होर्टी, ता. तुळजापूर हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अपघातानंतर नमूद ट्रक चालक जखमीस वैद्यकीय उपचाराची तजबीज न करता नजीकच्या पोलीस ठाण्यास खबर न देता अपघातस्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- पिरपाशा सय्यद यांनी 15 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी: अज्ञात चालकाने 13 मार्च रोजी 17.00 वा. सु. सरमकुंडी फाटा येथील चौकात स्विफ्ट डिझायर कार क्र. एम.एच. 13 एझेड 3996 ही निष्काळजीपणे, हयगईने चालवून मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ए 5998 ला पाठीमागून धडक दिली. या अपघातात मोसा चालक- शेषेराव रावसाहेब सुकाळे, वय 52 वर्षे यांसह पाठीमागील त्यांची पत्नी- संगीता, वय 48 वर्षे, दोघे रा. पिंपळगाव (लिंगी) हे मयत झाले तर मैथीली बाळासाहेब मोहिते ही 4 वर्षीय मुलगी जखमी झाली. अशा मजकुराच्या मयताचे नातेवाईक- सचिन बाबुराव सुकाळे, रा. सोनेगाव, ता. वाशी यांनी 15 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन अज्ञात चालकाविरुध्द भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web