गौण खनिज (वाळू) चोरणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

कळंब: ईटकुर शिवारातील वाशिरा नदि पात्रात अवैध गौण खनिज (वाळू) उत्खनन चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन महसुल विभागाच्या पथकाने दि. 19.05.2021 रोजी 18.00 वा. सु. नमूद ठिकाणी छापा मारला. यावेळी चालक- लक्ष्मण श्रीपती देसाई, रा. ईटकुर, ता. कळंब हे टाफे फर्ग्युसन कंपनीच्या विना नोंदणी क्रमांकाच्या ट्रॅक्टर- ट्रॉली मध्ये वाळू भरलेल्या स्थितीत आढळला. तसेच महसुल पथकाची चाहुल लागताच लक्ष्मण देसाई यांनी ट्रॅक्टरमधील वाळू जागीच ओतून ट्रॅक्टर- ट्रॉली घेउन निघून गेले. यावरुन सज्जा ईटकुरचे तलाठी- प्रविण पालके यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 511 सह गौण  खनिज अधिनियमम कायदा कलम- 21 (1) (2) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाया

उस्मानाबाद पोलीसांनी काल शुक्रवार दि. 04 जून रोजी जिल्हाभरात अवैध मद्य विरोधी 5 कारवाया करुन गुन्ह्यातील अवैध मद्य जप्त करुन संबंधीत व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 5 गुन्हे नोंदवले आहेत.

(1) सुरेश मानु राठोड, रा. बेळंबतांडा, ता. उमरगा हे बेळंब येथील आलुर रस्त्यालगतच्या शेतात एका कॅनमध्ये 9 लि. गावठी दारु (किं.अं. 940 ₹) बाळगलेले असतांना मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले.

(2) सुनिल दशरथ कदम, रा. आंबेवाडी, ता. उस्मानाबाद हे गावातील महाळंगी रस्त्यालगतच्या एका टपरीमागे कापडी पिशवीत अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 10 बाटल्या (किं.अं. 600 ₹) बाळगलेले तर प्रभु गणपती राठोड, रा. समुद्रवाणी तांडा, ता. उस्मानाबाद हे पाडोळी शिवारातील ‘आर्यन ढाबा’ येथे अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 10 बाटल्या (किं.अं. 600 ₹) बाळगलेले असलेले बेंबळी पो.ठा. च्या पथकास आढळले.

(3) सुमन माणीक राठोड, रा. जहागीरवाडी, ता. उस्मानाबाद या गडदेवदरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या आपल्या पत्रा शेडसमोर अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 15 बाटल्या व 45 लि. गावठी दारु (एकुण किं.अं. 3,600 ₹) बाळगलेल्या असलेल्या उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकास आढळल्या.

(4) व्यंकट बाबुराव गायकवाड, रा. गुरुवाडी, ता. उमरगा हे गुरुवाडी येथील आपल्या शेतात अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 12 बाटल्या (किं.अं. 720 ₹) बाळगलेले असलेले उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.

From around the web