लोकसेविकेच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
लोकसेविकेच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करणाऱ्यावर गुन्हा दाखल

शिराढोण: आरोग्य सेविका- संगिता डिगंबर गिरी या दि. 26 एप्रील रोजी 10.40 वा. सु. आरोग्य उपकेंद्र, कोथळा, ता. कळंब येथे सहकार्यासह कर्तव्यावर असतांना कोथळा येथील रहिवासी- नामदेव यशवंत चव्हाण याने नाका- तोंडास मास्क न लावता तेथे येउन मोठमाठ्याने आरडा- ओरड करण्यास सुरवात केली. यावर संगिता गिरी यांनी त्यास तसे न करण्यास सांगीतले असता नामदेव चव्हाण याने, “तु माझ्या भावाला कळंब येथील कोविड केंद्रात घेउन जावा असे का म्हणालीस, तु नोकरी कशी करतेस, तुला बघुन घेतो.” असे संगिता गिरी यांना धमकावून धक्काबुक्की करुन संगिता गिरी यांच्या शासकीय कर्तव्यात जाणीव पुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन संगिता गिरी यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नामदेव चव्हाण याच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 353, 323, 504, 506, 188, 269 सह साथ रोग प्रतिबंधक कायदा कलम- 2, 3, 4 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरीच्या दोन घटना 

 मुरुम: गुलाबराव शिवलिंगआप्पा पाटील, रा. मुरुम, ता. उमरगा यांनी मुरुम येथील गट क्र. 263 मधील शेतात ट्रेलर क्र. एम.एच. 25 बी 3847 हा लावलेला दि. 22- 25 एप्रील रोजी दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या गुलाबराव पाटील यांनी 26 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : सुनिल पंडीत साळी, रा. उस्मानाबाद यांच्या उस्मानाबाद येथील शेत गट क्र. 70/2 मधील कुंपनलीकेतील लुबी कंपनीचा 5 अश्वशक्ती क्षमतेचा विद्युत पंप, पाईप- 16 नग व फिनोलेक्स वायर- 109 मिटर असा एकुण 50,328 ₹ चा माल अज्ञात वय्क्तीने दि. 24- 26 एप्रील रोजी दरम्यान चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या सुनिल साळी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web