परस्पर विरोधी स्टेटस ठेवल्याच्या कारणावरुन सिंदफळमध्ये हाणामारी 

 

तुळजापूर: फेसबुकवर परस्पर विरोधी स्टेटस ठेवल्याच्या कारणावरुन सिंदफळ, ता. तुळजापूर येथील व्यवहारे कुटूंबातील शहाजी, धनाजी, सचिन, मधुकर यांसह सागर घाटे यांच्या गटाचा गावकरी- मिसाळ कुटूंबातील सुहास, मारुती, अशोक, विशाल, संदीप यांसह विश्वजीत नवगिरे व तुळजापूर येथील दिपक जगताप, गणेश गंधोरे व अन्य तीन अनोळखी व्यक्ती यांच्या गटाशी 28 मार्च रोजी 17.30 वा. सु. सिंदफळ येथे वाद झाला. 

या वादाचे पर्यावसान हानामारीत होउन दोन्ही गटांतील व्यक्तींनी परस्पर विरोधी गटांतील व्यक्तींस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, तलवार, चाकु, काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या शहाजी व्यवहारे व अजय मिसाळ यांनी परस्परविरोधी दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 307, 452, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 सह शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.


ढोकी: केशकर्तनालय चालक- तात्या अशोक राउत, रा. तेर, ता. उस्मानाबाद यांनी 28 मार्च रोजी 19.45 वा. सु. गावकरी- बबन हरी शेळके यांना त्यांच्या वडीलांच्या नावाने हाक मारली. यावर  बबन यांनी चिडून जाउन तात्या राउत यांना शिवीगाळ करुन चापटाने, चावीच्या कटरने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या तात्या राउत यांनी 29 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद -  सय्यद फैजल अब्दुलभाई, रा. गालीबनगर, उस्मानाबाद हे 28 मार्च रोजी 12.30 वा. सु. आपल्या पत्रा शेडमध्ये होते. यावेळी भुखंड मालकीच्या कारणावरुन नातेवाईक- मैनोद्दीन खतीब, आजीम खतीब, आसिफा खतीब या तीघांनी सय्यद फैजल यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                  

From around the web