उस्मानाबादेत आणि येडशी येथे हाणामारी 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  - न्हानी घराचे सांडपाणी वाहन्याच्या वादातुन येडशी येथील द्रौपदी मंजुळे यांना त्यांच्या घरासमोर भाऊबंद दशरथ, अनिता, लक्ष्मण, विजु  यांनी 22 जुन रोजी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या द्रौपदी  यांनी दि. 25 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उस्मानाबाद  -  रुतुजा इश्वर इंगळे  रा. अजिंठा नगर  उस्मानाबाद या  22 जुन रोजी 20.30 वा आपल्या घरासमोर होत्या. यावेळी गल्लीतील  आकाश व  गोपी बनसोडे या दोघां भावासह अक्षय गंगावणे यांनी रुतुजा यांसह त्यांच्या वडीलांस  शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या रुतुजा   यांनी दि. 25 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 327, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


चोरीच्या दोन घटना 

उस्मानाबाद  - सादिक शेख  रा. उस्मानाबाद  यांच्या जहागीरदारवाडी येथील शेतातील घराचे  30 पत्रे व दारे खिडक्या हे दि. 31 मे  रोजी 08.30 वा जहागीरदारवाडी मधला तांडा येथील राठोड कुटुंबांतील 8 स्त्री-पुरुषांनी चोरुन नेले. अशा मजकुराच्या त्यांच्या  दि. 25  जून रोजीच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद - सिध्देश्वर शिंदे रा. शांतीनिकेतन, उस्मानाबाद यांच्या घराचा कडी-कुलुप  दि. 23-25 जुन दरम्यान  अज्ञाताने उचकटुन घरातील 7.5 ग्राम सुवर्ण दागिने व 20,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या शिंदे  यांनी दि. 25 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                   

From around the web