उस्मानाबाद जिल्ह्यात नळी आणि जागजी मध्ये हाणामारी 

 
उस्मानाबाद जिल्ह्यात नळी आणि जागजी मध्ये हाणामारी

आंबी: नळी, ता. भुम येथील 1)छगन सुग्रीव हराळ 2)सुग्रीव गणपत हराळ 3)आप्पा भिमराव हराळ या तीघांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन 24 एप्रील रोजी 11.00 वा.सु. वसाहतीतील लक्ष्मीआई मंदीराच्या कट्ट्यावर गावकरी- अच्युत विनायक सलगर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, काठीने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अच्युत सलगर यांनी 27 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 ढोकी: जागजी तांडा, ता. उस्मानाबाद येथील उत्तम व पवन उत्तम राठोड या दोघा पिता- पुत्रांनी आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन दि. 27 एप्रील रोजी 11.00 वा. सु. तांड्यातील- मनिषा सुर्यकांत राठोड यांसह केशव राठोड, रेश्मा राठोड या तीघांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मनिषा राठोड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

“मोटार वाहन कायदा अंतर्गत 176 कारवाया- 37,300 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त.”

 उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलीस ठाणी, शहर वाहतूक शाखा यांनी 27 एप्रील रोजी जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांवर मोटार वाहन कायदा अंतर्गत 176 कारवाया करुन 37,300 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसुल केले आहे.

From around the web