कळंब आणि नालगावमध्ये हाणामारी 

 
Osmanabad police

परंडा: कैलास गजेंद्र करळे व संतोष गजेंद्र करळे, दोघे रा. नालगाव, ता. परंडा यां दोघा भावांच्या नालगाव गट क्र. 330 मध्ये असणाऱ्या जमीनीचा सामाईक बांध दि. 20 मे रोजी 17.00 वा. सु. संतोष करळे हे खोऱ्याने काढत होते. यावर भाऊ- कैलास करळे यांनी बांध काढण्याचा जाब विचारला असता संतोष यांनी कैलास यांसह त्यांच्या पत्नीस शिवीगाळ करुन खोऱ्याच्या दांड्याने मारहाण करुन कैलास यांना चावा घेउन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या कैलास करळे यांनी दि. 21 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 कळंब: कळंब येथील 1)शंकर पवार 2)अभि काळे व शंकर यांचा माठा मुलगा अशा तीघांनी कौटुंबीक कारणावरुन दि. 20 मे रोजी 19.45 वा. सु. कल्पनानगर पारधी पिढी, कळंब येथे बबन शामराव काळे, रा. केज यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली  व ठार मारण्याची धमकी दिली. तसेच कोयत्याने बबन यांच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या बबन काळे यांनी दि. 21 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web