येवती, अणदूर, वालवड येथे हाणामारी 

 
Osmanabad police

ढोकी: येवती, ता. उस्मानाबाद येथील श्रीकृ्ष्ण सोपान पडुळकर यांसह कुटूंबातील- गणेश, संतोष, निकीता, सुवर्णा, स्वाती, शामल यांचा येवती येथीलच- निवृत्ती सलगर यांसह कुटूंबातील- दिगंबर, दत्तात्रय, सुनिल, बालाजी, राजश्री व पांडुरंग मदने, बालाजी मदने अशा दोन्ही गटांचा जुन्या भांडणाच्या कारणावरुन दि. 27.05.2021 रोजी रोजी 19.30 वा. सु. येवती येथे वाद झाला. यात दोन्ही गटांतील सदस्यांनी परस्परविरोधी गटांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने, प्लास्टीक पाईपने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दोन्ही गटांतील सदस्यांनी परस्परविरोधी दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

नळदुर्ग: अणदुर, ता. तुळजापूर येथील निलकंट बडाप्पा करपे हे दि. 24 मे रोजी 11.00 वा. सु. अणदुर येथील शेतीची मशागत करत होते. यावेळी गावकरी- सुभाष तुकाराम काळे, गोरख तुकाराम काळे, श्रीदेवी सुभाष काळे यांनी तेथे येउन, “ हे शेत आमचे असुन तुम्ही कोणाला विचारुन मशागत करता.” असे निलकंट करपे यांना धमकावून शिवीगाळ करुन टिकावाच्या तुंब्याने मारहाण करुन जखमी केले. यावेळी निलकंट यांच्या बचावास सरसावलेल्या त्याच्या मुलासही नमूद तीघांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या निलकंट करपे यांनी दि. 28 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 भुम: वालवड, ता. भुम येथील जोतीराम व विलास जोतीराम फारणे या दोघा पिता- पुत्रांनी शेत मोजणीच्या कारणावरुन दि. 27 मे रोजी 18.00 वा. सु. राहत्या गल्लीत भाउबंद- भास्कर विठ्ठल फारणे यांसह त्यांची पत्नी- गंधुबाई यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या भास्कर फारणे यांनी दि. 28 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                  

From around the web