वडगाव , वालवड, जकेकुरवाडी,पाथर्डी येथे हाणामारी 

 
वडगाव , वालवड, जकेकुरवाडी,पाथर्डी येथे हाणामारी

भूम : वडगाव (नळी), ता. भुम येथील 1)श्याम गायकवाड 2)शहाजी गायकवाड 3)हिराबाई गायकवाड यांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 15 मे रोजी 09.30 वा. सु. गावातील महादेव मंदीराच्या सभामंडपात गावकरी- आत्माराम जानु गायकवाड यांसह त्यांच्या पत्नीस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच श्याम गायकवाड यांनी आत्माराम यांच्या हातास चावा घेउन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या आत्माराम गायकवाड यांनी दि. 16 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत वालवड, ता. भुम येथील सुरेश उदयभान कांबळे हे दि. 15 मे रोजी 05.45 वा. सु. वालवड येथील शेतबांधावर उभे होते. यावेळी त्यांचा भाऊ- महादेव उदयभान कांबळे यांसह त्यांची मुले- आश्रु व बाळु या तीघांनी शेतबांधावर उभारल्याच्या व बांधवरील दगड शेतात टाकल्याच्या कारणावरुन सुरेश कांबळे यांसह त्यांचा मुलगा- विकास यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. तसेच दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुरेश कांबळे यांनी दि. 16 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 उमरगा: जकेकुरवाडी, ता. उमरगा येथील बालाजी जमादार यांसह त्यांची मुले- जितेंद्र व रविंद्र अशा तीघांनी दि. 15 मे रोजी 22.00 वा. सु. शेतीच्या जुन्या वदावरुन गावकरी- राम व्यंकट जमादार यांच्या घरात घुसून राम यांसह त्यांच्या कुटूंबीयांना शिवीगाळ करुन दगडाने मारहाण केली व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या राम जमादार यांनी दि. 16 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 कळंब: पाथर्डी, ता. कळंब येथील 1)भागवत चिलवंत 2)सविता चिलवंत 3)श्रीकांत चिलवंत यांनी जमीन वाटणीच्या कारणावरुन दि. 15 मे रोजी 19.00 वा. सु. पाथर्डी येथे भाऊ- शोभीवंत चिलवंत यांसह त्यांच्या पत्नी व मुलास शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शोभीवंत चिलवंत यांनी दि. 16 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                  

From around the web