उस्मानाबाद जिल्ह्यात दोन ठिकाणी हाणामारी 

 

लोहारा: सुजाता बालाजी साळुंके, रा. धानुरी, ता. लोहारा यांच्या शेताच्या सामाईक बांधावरील झाडे भाऊबंद- भरत तुकाराम साळुंके, विशाल साळुंके, तुकाराम साळुंके हे दि. 21.11.2020 रोजी 12.00 वा. सु. तोडत होते. यावर सुजाता यांनी त्यांना विरोध केला असता त्या तीघांनी सुजाता साळुंके यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन सुजाता यांच्या हातावर कुऱ्हाडीने वार करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुजाता साळुंके यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

परंडा: विजय बळीराम हजारे कौंडगाव, ता. परंडा यांच्या  शेतातील पाणी शेजारच्या- गोफणे यांच्या शेतात गेले होते. याचा राग मनात धरुन दि. 21.11.2020 रोजी 17.30 वा. सु. गोफणे कुटूंबातील विकास, जयदेव, धैर्यशील, विशाल, बाजीराव, बाआ, किसन, औदुंबर, कुलदीप यांनी बळीराम व विजय हजारे या पिता- पुत्रांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या विजय हजारे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुने भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web