उस्मानाबाद , जहागीरदारवाडी येथे हाणामारी 

 
Osmanabad police

उस्मानाबाद -  माधुरी खंडु सुरवसे, रा. जहागीरदारवाडी, ता. उस्मानाबाद यांना दि. 09 जून रोजी 16.00 वा. सु. राहत्या घरासमोर त्यांचा दिर- विकास चंदर सुरवसे यांनी घराच्या मालकीहक्काच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लोखंडी पाईपने मारहान केली. तसेच माधुरी यांसह त्यांचे पती- खंडु यांना ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या माधुरी सुरवसे यांनी दि. 10 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 उस्मानाबाद -  उस्मानाबाद  शहरातील ‘आर्या हॉटेल’ मध्ये ग्राहक- काशीनाथ साळुंखे व प्रभु साळुंखे, दोघे रा. वडारगल्ली, उस्मानाबाद यांनी जेवण केल्यानंतर हॉटेल मालक- बालाजी वगरे यांनी त्यांस जेवणाचे पैसे मागीतले. यावर नमूद दोघांनी जेवणाचे पैसे देण्यास नकार देउन अन्य सात जणांच्या सहायाने बालाजी वगरे यांसह हॉटेलमधील त्यांचे नातेवाईक- प्रशांत पानसरे, पांडुरंग वगरे, नरसिंह मेटकरी अशा चौघांना शिवीगाळ करुन लोखंडी गज, विटा, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. तसेच हॉटेल मधील साहित्याची व अन्य ग्राहकांच्या दुचाकीचे तोडफोड करुन नुकसान केले. अशा मजकुराच्या बालाजी वगरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 326, 324, 323, 504, 506, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपहरण

उस्मानाबाद -   “शौचास जाउन येते.” असे पित्यास सांगुन दि. 10.06.2021 रोजी घराबाहेर पडलेली 17 वर्षीय युवती (नाव- गाव गोपनीय) घरी परतली नाही. यावर तीच्या कुटूंबीयांनी तीचा शोध घेतला असता घराच्या परिसरातीलच एक युवक तीला फुस लाउन कोठेतरी घेउन गेला असल्याचे समजले. यावरुन तीच्या आईने दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीत युवकाविरुध्द अपहरणाचा गुन्हा भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत नोंदवला आहे.

                                                                                  

From around the web