नळदुर्ग, उंडरगांव, पळसप येथे हाणामारी

 
नळदुर्ग, उंडरगांव, पळसप येथे हाणामारी

लोहारा: उंडरगांव, ता. लोहारा येथील अमर व राहुल सुरेश सुर्यवंशी या दोघा बंधुंनी गावातील नातेवाईक- केशव हनुमंत सुर्यवंशी यांच्या आईच्या वाट्याची शेत जमीन कसण्याच्या कारणावरुन दि. 01 मे रोजी 21.00 वा. सु. केशव सुर्यवंशी यांसह त्यांचा मुलगा- अक्षय यांना त्यांच्या राहत्या घरासमोर शिवीगाळ करुन धारदार शस्त्राने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या केशव सुर्यवंशी यांनी 02 मे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 324, 504, 506, 34 अंतर्गत  गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग: पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन नळदुर्ग, ता. तुळजापूर येथील शेख कुटूंबातील- मोहियोद्दीन, मुदस्सर, निजामोद्दीन यांसह इकबाल पटेल, रा. नागरसोगा, ता. लातूर यांचा फरहान शेख यांच्या कुटूंबातील फुरखॉन, इमाम यांच्याशी दि. 20.04.2021 रोजी रोजी 09.00 वा. सु. नळदुर्ग येथील कंदुरमाळा येथे वाद झाला. यात दोन्ही कुटूंबातील सदस्यांनी परस्परविरोधी कुटूंबीयांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, तलवार, लोखंडी गज, काठीने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मोहियोद्दीन शेख व फरहान शेख यांनी परस्परविरोधी दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

ढोकी: पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन पळसप, ता. उस्मानाबाद येथील लाकाळ कुटूंबातील- नामदेव, रोहन, रामलिंग, दयानंद यांच्या व गावकरी- दोन कुटूंबातील सुरज, विष्णु, सुशिल यांच्या गटाचा दि. 02.05.2021 रोजी रोजी 10.30 वा. सु. पळसप शेत शिवारात वाद झाला. यात दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटांतील व्यक्तींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केलेव ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या नामदेव लाकाळ व सुरज दाने यांनी परस्परविरोधी दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web