नागझरी तांडा, गोजवाडा, खानापूर, लोहारा येथे हाणामारी 

 
Osmanabad police

नळदुर्ग: नागझरी तांडा, गंधोरा, ता. तुळजापूर येथील बाबु राठोड, लक्ष्मण राठोड, निर्मलाबाई राठोड, ज्योती राठोड अशा चौघांनी संगणमताने शेतीच्या सीमेवरुन दि. 27 मे रोजी 17.30 वा. सु. नागझरी तांडा शिवारात गावकरी- निलप्पा सिताराम राठोड यांना शिवीगाळ करुन कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहान केली. तसेच निलप्पा यांच्या बचावास आलेल्या त्यांच्या पुतन्यासही नमूद चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहान केली. अशा मजकुराच्या निलप्पा राठोड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी: गोजवाडा, ता. वाशी येथील वैजिनाथ लोंढे, विजयकुमार लोंढे, प्रकाश लोंढे, नितीन अशा चौघांनी संगणमताने पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 24 मे रोजी 07.15 वा. सु. गावकरी- बबन जनार्धन आरण यांच्या घरात घुसून नमूद चौघांनी बबन यांसह त्यांच्या कुटूंबीयास शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लोखंडी गज, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या बबन आरण यांनी दि. 27 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत गोविंद निवृत्ती कदम, रा. खानापुर, ता. वाशी हे त्यांच्या मुलासह दि. 25 मे रोजी 15.00 वा. सु. खानापुर गट क्र. 123 मधील आपल्या शेतात होते. यावेळी गावकरी- महेश कदम, मधुकर कदम, महादेव कदम, अभिजीत कदम अशा चौघांनी तेथे जाउन एक्सकॅव्हेटर यंत्राच्या सहायाने सामाईक बांध फोडण्यास सुरवात केली. यावर गोविंद कदम यांनी त्यांची अडवणूक केली असता नमूद चौघांनी गोविंद यांसह त्यांच्या मुलास शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी देउन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान केली. या मारहानीत गोविंद कदम यांच्या उजव्या हाताचे हाड मोडले. अशा मजकुराच्या गोविंद कदम यांनी दि. 27 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 लोहारा: आलीम कलीम बांदार, रा. लोहारा हे दि. 27 मे रोजी 11.30 वा. सु. लोहारा येथील आपल्या शेताची मशागत करत होते. यावेळी गावकरी- फय्याज कुरेशी, अय्याज कुरेशी, मिनाज कुरेशी, रियाज कुरेशी अशा चौघांनी, “हे शेत आमचे असुन तु कुळवायचे नाही. तु येथुन निघून जा नाहीतर तुला ठार मारु.” असे आलीम यांना धमकावुन शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या आलीम बांदार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 447, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web