लोहारा,लोहगाव,बरमाचीवाडी येथे हाणामारी 

 
Osmanabad police

परंडा: लक्ष्मण तुकाराम गव्हाने, रा. लोहारा, ता. परंडा हे दि. 22.05.2021 रोजी 22.00 वा. सु. शेत- घर असे पायी जात होते. यावेळी गावातील गव्हाने कुटूंबातील- रुपेश, समाधान, ज्ञानदेव, सुरेखा, सुनीता, अंजली यांनी लक्ष्मण गव्हाने यांना अडवून “तुझ्यामुळे गणेश डांगे व दासु डांगे यांनी शेत रस्ता आडवला आहे.” असे लक्ष्मण यांना धमकावून शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले. यावेळी लक्ष्मण यांच्या बचावास त्यांचे भाऊ- भावजय आले असता नमूद सहाजणांनी लक्ष्मण यांना  गावातील सीनामाई हॉटेलमध्ये हॉटेलच्या वेटरच्या मदतीने कोंडून तर बाहेरील भाऊ- भावजय यांना शिवीगाळ करुन काठीने मारहाण केली. अशा मजकुराच्या लक्ष्मण गव्हाने यांनी दि. 23 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुने भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 341, 342, 324, 325, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 नळदुर्ग: दत्तात्रय माणिक इंगोले, रा. लोहगाव, ता. तुळजापूर हे दि. 23 मे रोजी 17.00 वा. सु. लोहगाव येथील आपल्या शेतातील चगळ, दगड त्यांचा भाऊ- मारुती इंगोले यांच्या शेतात टाकत होते. यावर त्याचा जाब मारुती यांनी दत्तात्रय यांस विचारला असता दत्तात्रय यांनी मारुती यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मारुती इंगोले यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 येरमाळा: ओमकार महाजन, रा. बरमाचीवाडी, ता. कळंब यांना दि. 22.05.2021 रोजी 19.00 वा. सु. गावकरी- धिरज मुठाळ व उमाकांत कदम यांनी भ्रमणध्वनीमार्फत अश्लील शिवीगाळीचा संदेश केला. यावर ओमकारयांनी नमूद दोघांना जाब विचारला असता त्या दोघांनी आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन ओमकार यांना शिवीगाळ करुन लोखंडी गजाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या ओमकार महाजन यांनी दि. 23 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 507, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                   

From around the web