इंदापूर, नांदगाव येथे हाणामारी 

 
Osmanabad police

वाशी: इंदापुर, ता. वाशी येथील बिभीषण काशीनाथ गपाट व मंगल गपाट या दोघांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 28 मे रोजी 18.30 वा. सु. इंदापुर गट क्र. 32 मधील शेतात भाऊबंद- चंद्रकांत एकनाथ गपाट यांसह त्यांची पत्नी- दमयंती यांना शिवीगाळ करुन काठीने, कुऱ्हाडीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या चंद्रकांत गपाट यांनी दि. 29 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी: नांदगाव, ता. वाशी येथील सुरेश चत्रभु बांगर यांसह मछिंद्र सारुक, उमाकांत सानप असे तीघे दि. 28 मे रोजी 05.00 वा. सु. गावातील मारुती मंदीरासमोर उभे असलेले गावकरी- दादाराव जाधवर यांना सार्वजनिक विद्युत पंप चालू करण्याबाबत विचारण्यासाठी गेले होते. यावेळी दादाराव जाधवर यांसह जाधवर कुटूंबातील- संतराम, महादेव, राजाभाउ, विकास, अनिल, विशाल, अशोक, बाळु व दत्ता घुले, पांडुरंग घुले, प्रकाश सारुक या सर्वांनी संगणमताने बेकायदेशी जमाव जमवून नमूद तीघांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, काठीने मारहान करुन जखमी केले. यावेळी नमूद तीघांच्या बचावास आलेले गावकरी- तुळशीराम सारुक व रमाकांत सानप यांनाही नमूद बाराजणांनी शिवीगाळ करुन मारहान केली आणि ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुरेश बांगर यांनी दि. 29 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन 143, 147, 148, 149, 326, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            तर दुसऱ्या घटनेत महादेव केदारी जाधवर, रा. नांदगाव, ता. वाशी हे भाऊबंद- दाराराव, संतराम, अनिल असे सर्वजण दि. 28 मे रोजी 06.00 वा. सु. राहत्या गल्लीत बोलत थांबले होते. यावेळी मागील भांडणाच्या कारणावरुन गावकरी- मछिंद्र सारुक, तुळशीराम सारुक, भारत सारुक, प्रभाकर सारुक, रमाकांत सानप, उमाकांत सानप, जाकीर सय्यद, कादर शेख, लखन घुले अशा 9 जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून नमूद चौघांना शिवीगाळ करुन कोयता, दगड, लोखंदी गजाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या महादेव जाधवर यांनी दि. 29 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 326, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web