कसबे  तडवळे, कळंब, एकोंडी, बेंबळी आदी पाच ठिकाणी हाणामारी 

 
कसबे तडवळे, कळंब, एकोंडी, बेंबळी आदी पाच ठिकाणी हाणामारी

ढोकी: तडवळा (कसबे ), ता. उस्मानाबाद येथील सावंत कुटूंबातील मिठ्ठु , बालाजी, अर्जुन, धनाजी, प्रमिला, किरण, भिमा, मारुती अशा 8 जणांनी दि. 28 एप्रील रोजी 15.00 वा. सु. तडवळा (कसबे) शेत शिवारात गावकरी- बाबुराव व सागर बाबुराव लांडगे या दोघा पिता- पुत्रांना शेतजमीन मोजनीच्या व शेतात ताल टाकण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी देउन लाथाबुक्क्यांनी, काठीने, कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या सागर लांडगे यांनी दि. 29 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 324, 504, 506, 269, 188 सह कोविड- 19 विनियमन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 मुरुम: 1)रहिम सुलतान खैराटे, रा. मुरळी 2)कार्तिक भोकले 3)अभिषेक मंडले, दोघे रा. बेरडवाडी यांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 29 एप्रील रोजी 09.30 वा. सु. मुरळी येथील- भरत नामदेव देडे यांच्या घरात घुसून अमोल यांसह त्यांची भाची- सोनाली, भाचा यांना शिवीगाळ करुन हंटरने मारहाण करुन जखमी केले. सदर मारहाणीत देडे यांच्या बचावास आलेले गावकरी- अरुण नारायण सरवदे यांनाही हंटरने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या भरत देडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब: कळंब येथील 1)सम्राट गायकवाड 2)अमोल राऊत 3)अनुरथ कसबे यांसह अन्य एक अनोळखी व्यक्ती यांनी पुर्वीच्या भांडण- तक्रारीवरुन दि. 12 एप्रील रोजी 23.30 वा. सु. कळंब येथील बलाई मंगल कार्यालय समोर सावरगांव (क.), ता. कळंब येथील ऋषीकेश परमेश्वर महाजन यांना शिवीगाळ करुन लोखंडी गज, दगड, काठीने मारहाण करुन जखमी करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या ऋषीकेश महाजन यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 उमरगा: शेत बांध फोडल्याच्या कारणावरुन 1)अनिता सरवसे 2)दिपक सोनकांबळे 3)भुजंग सुरवसे, तीघे रा. एकोंडी, ता. उमरगा 4)सहदेव कांबळे 5)रोहित कांबळे, दोघे रा. उमरगा यांनी दि. 29 एप्रील रोजी 12.00 वा. सु. एकोंडी शेत शिवारात वनिता मधुकर गायकवाड, रा. एकोंडी यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहाण केली. अशा मजकुराच्या वनिता गायकवाड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 बेंबळी: शेतातून रहदारीस मनाई केल्याचा राग मनात धरुन वाडीबामणी, ता. उस्मानाबाद येथील 1)अजय मोटे 2)तात्याराव शिंदे 3)अनिल शिंदे 4)अमर शिंदे 5)ज्ञानदेव शिंदे 6)भागवत मोटे 7)ऋषीकेश शिंदे 8)राम शिंदे या सर्वांनी 27 एप्रील रोजी 21.00 वा. सु. गावातील हनुमान मंदीर चौकात गावकरी- मुकुंद टकले यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच मुकुंद यांच्या बचावास आलेले त्यांचे भाऊ- अमोल व दिपक यांनाही नमूद लोकांनी काठीने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या  मुकुंद टकले यांनी दि. 29 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 143, 147, 148, 149, 504, 506, 188 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web