डोकेवाडी,पळसप,जागजी येथे हाणामारी 

 
Osmanabad police

वाशी : रेशमा निखील भोसले यांसह पती-निखील, सासरे-तात्या, सासु-रेणुका ,मुलगी-दिक्षा  यांना रा.डोकेवाडी हे   दिनांक 04 जुलै रोजी 20.00 वा  आपल्या घरात होते. यावेळी जामखेड  येथील  नातेवाईक 1)विक्या उर्फ विक्या भोसले , 2)नागेश भोसले, 3)अनुल उर्फ भैय्या  भोसले तिघे रा. डोकेवाडी व 4)भोलडया काळे यांनी मागील भांडणाचा रागातुन  नमुद रेशमा भोसले कुटुंबीयांस  शिवीगाळ करुन दगडाने , काठीने मारहाण करुन जखमी केले.  अशा मजकुराच्या रेशमा यांनी  दिनांक 04 जुलै रोजी  दिलेल्या प्रथम खबरे वरुन भादसं  324,323, 504,506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 ढोकी: चद्रसेन सुदामा कांबळे, रा. पळसप हे दिनांक 04 जुलै रोजी 07.30 वा नातेवाईक कुमार व  प्रमोद नागनाथ गायकवाड या भावांसह आपल्या घरासमोर उभे होते. यावेळी गावकरी मंगल व संजय रमेश कांबळे, अर्जुन व भिमा बब्रुवान सुर्यवंशी यांनी जुन्या वादातुन  शिवीगाळ करुन कंबर पटटा, दगडाने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या  चंद्रसेन यांनी  दिनांक 05  जुलै रोजी  दिलेल्या प्रथम खबरे वरुन भादसं  324,323, 504,506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी: जागजी  येथील जयकुमार व  विजयकुमार महादेव देशमुख  हे दोघे बंधु  दिनांक 04 जुलै रोजी 19.00 वा गावातील रस्त्यावर असतांना  भाउबंद –विजयकुमार माणीक देशमुख यांच्याशी  पाण्याच्या नळा भोवती दगड लावण्याच्या  कारणातुन वाद झाला. यावेळी विजयकुमार माणीक देशमुख यांनी  जयकुमार व  विजयकुमार महादेव देशमुख  यांना शिवीगाळ करुन दगडाने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. यात विजयकुमार यांच्या गुडघ्याचे हाड मोडले.  अशा मजकुराच्या  जयकुमार महादेव देशमुख यांनी  दिनांक 05  जुलै रोजी  दिलेल्या प्रथम खबरे वरुन भादसं  326, 324, 504,506  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web