देवळाली, रामकुंड येथे हाणामारी 

 
Osmanabad police

उस्मानाबाद -  देवळाली, ता. उस्मानाबाद येथील गणेश महादेव सुर्यवंशी यांसह आण्णासाहेब सुर्यवंशी, नागनाथ कांबळे, प्रतिक कांबळे, प्रविण कांबळे यांच्या गटाचा गावातीलच-सतीश बाळासाहेब सुर्यवंशी यांसह अभय सुर्यवंशी, बालाजी कवडे यांच्या गटाचा दि. 07 जून रोजी 18.00 वा. सु. राहत्या गल्लीत पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन वाद उफाळून आला. यात दोन्ही गटांतील सदस्यांनी परस्परविरोधी गटांतील सदस्यांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, दगड, काठीने मारहान केली व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या गणेश सुर्यवंशी व सतीश सुर्यवंशी यांनी दि. 08 जून रोजी परस्परविरोधी दिलेल्या दोन प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 448, 337, 327, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत स्वतंत्र दोन गुन्हे नोंदवले आहेत.

वाशी: काकासाहेब खांडेकर, कुमार कांबळे, अनिकेत खांडेकर, अजिंक्य खांडेकर, सर्व रा. रामकुंड, ता. वाशी या चौघांनी दि. 07 जून रोजी 19.00 वा. सु. गावकरी- कैलास बिरमल हाके यांना त्यांच्या घरासमारे वाहनाने हुलकावनी दिली. याचा जाब कैलास हाके यांनी नमूद चौघांना विचारला असता त्यांनी कैलास हाके यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, वायरने, कुऱ्हाडीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या कैलास हाके यांनी दि. 08 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                  

From around the web