आसू, हिंगळजवाडी, गोविंदपुर येथे हाणामारी 

 
Osmanabad police

परंडा: आसु, ता. परंडा येथील वैभव वसंत जाधव व जयवंत जेजेराम जाधव या दोघांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 03 जून रोजी 08.00 वा. सु. आसु शिवारात गावकरी- हरीप्रसार महादेव लोखंडे यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली व काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या हरीप्रसाद लोखंडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 341, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी: हनुमंत बबन हाजगुडे, रा. हिंगळजवाडी, ता. उस्मानाबाद यांनी आपला विमा काढण्यासाठी भाऊबंद- गजानन तुळशिराम हाजगुडे यांना 10,000 ₹ दिले होते. कालांतराने हनुमंत हाजगुडे यांनी ती रक्कम गजानन यांना परत मागीतली असता पैसे देण्यास नकार देउन गजानन यांनी भाऊ- नाना यांच्या मदतीने हनुमंत यांना शिवीगाळ करुन काठीने मारहाण केली. या मारहानीत हनुमंत हाजगुडे यांच्या डाव्या पायाच्या नडगीचे हाड मोडले आहे. अशा मजकुराच्या हनुमंत हाजगुडे यांनी दि. 03 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 शिराढोण : जमीन वाटणीच्या कारणावरुन उत्रेश्वर शंकर मस्के, रा. गोविंदपुर, ता. कळंब यांना दि. 31.05.2021 रोजी 10.30 वा. सु. गावातील ढोकी रस्त्यावर मस्के कुटूंबातील नातेवाईक- बालाजी, गणेश, गजानन, दिनेश अशा चौघांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, वायरने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या उत्रेश्वर मस्के यांनी दि. 03 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web