आलूर, मुरूम, दहिटणा येथे हाणामारी 

 
Osmanabad police

मुरुम: आजुबी मियाजानी पिरजादे, रा. आलुर, ता. उमरगा या पती- मियाजानी यांसह दि. 25 मे रोजी 07.30 वा. सु. आलुर येथील शेतात होत्या. यावेळी गावकरी- कलीम लोहारे, शरिफ लोहारे, आसिफ लोहारे, रफिक लोहारे, बाबु लोहारे अशा पाच जणांनी संगणमताने, “हि जमीन आमची असुन शेत नांगरणी करायची नाही.” असे नमूद पिरजादे पती- पत्नीस धमकावून शिवीगाळ केली व ठार मारण्याची धमकी देउन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या आजुबी पिरजादे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 336, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 मुरुम: खाडे गल्ली, मुरुम, ता. उमरगा येथील दिगंबर सहदेव वाघमारे यांनी पुर्वीच्या वादावरुन दि. 24 मे रोजी 20.30 वा. सु. राहत्या गल्लीत भाऊ- सिध्दु सहदेव वाघमारे यांना शिवीगाळ करुन लाकडी दांड्याने मारहान करुन जखमी केले. सिध्दु यांच्या बचावास आलेल्या त्यांच्या पत्नीसही दिगंबर यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सिध्दु वाघमारे यांनी दि. 25 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुने भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 परंडा: दहिटणा, ता. परंडा येथील नागेश दादा शिंदे, योगेश दादा शिंदे, दादा शिंदे, सुनिता शिंदे यांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 23 मे रोजी 22.30 वा. सु. जनार्दन व अविनाश जनार्दन शिंदे या दोघा पिता- पुत्रांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. यावेळी नागेश व योगेश शिंदे या दोघा भावांनी जनार्दन शिंदे यांच्या डोक्यात कोयता मारल्याने ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या अविनाश शिंदे यांनी दि. 25 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद चौघा जणांविरुध्द भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                   

From around the web