शेतकऱ्यांनी रोपवाटिका योजनेसाठी अर्ज करावे

 
शेतकऱ्यांनी रोपवाटिका योजनेसाठी अर्ज करावे

उस्मानाबाद -राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना सन २०२०-२१ अंतर्गत रोपवाटीका या घटकाकरीता लाभ घेण्यासाठी इच्छुक अनुसूचित जाती (S.C) शेतकऱ्यांकडुन अर्ज मागविण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

हा कार्यक्रम राबविताना मार्गदर्शक सुचनांचा काटकोरपणे अवलंब करणेबाबत व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लाभ देण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. या योजने अंतर्गत भाजीपाला पिकांची दर्जेदार व किडरोग मुक्त रोपे निर्मिती करून उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे,रोपवाटिकेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीपुरक व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणे, टोमॉटो, वांगी,कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा इ. व इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवाटीका उभारणीचा लाभ घेता येतो.

सदर योजनेकरीता जिल्हयासाठी अनुसूचित जातीसाठी एकूण भौतिक ०२ व आर्थिक रु. ४.६० लाख इतका लंक्षाक देण्यात आला असून त्या अनुषंगाने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर योजनेमध्ये शेडनेट गृह, प्लॉस्टिक टनेल, पॉवर नॅपसॅक स्प्रेअर व प्लास्टिक क्रेटस इत्यांदी घटकासाठी रु. ४.६० लाख प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के म्हणजे रु. २.३० लाख रुपये अनुदान देय आहे.

तरी सन २०२०-२१ मधील अनुसूचित जातीच्या इच्छुक शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांचेकडे ऑफलाईन अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी नजीकच्या मंडळ कृषि अधिकारी /तालुका कृषि अधिकारी तसेच संबधीत कृषि सहाय्यकाशी संपर्क साधावा. तसेच योजनेच्या मार्गदर्शक सूचना व अधिक माहितीसाठी http://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट देण्यात यावी.असे आवाहन श्री यु.आर. घाटगे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

From around the web