कोविड मनाई आदेश झुगारुन व्यवसायास चालू ठेवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

उस्मानाबाद  - कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी मास्क वापर, दुकाना संबंधी वेळेचे निर्बंध असे इत्यादी मनाई आदेश जारी केले आहेत. या आदेशांचे उल्लंघन करुन दि. 27 जून रोजी पोहनेर येथे  पान टपरी व्यवसायास चालु ठेवली असल्याचे सुंदर संभाष धावारे हे उस्मानाबाद ग्रामीण पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

सार्वजनिक ठिकाणी रहदारीस धोका निर्माण करणाऱ्या एक व्यक्तींवर गुन्हा दाखल

उस्मानाबाद  - रहदारीस धोका अडथळा निर्माण होईल अशा रितीने रस्त्यात वाहन  उभे करणा-या  एका व्यक्तींवर उस्मानाबाद-ग्रामीण पोलीसांनी दि. 27 जून रोजी  भादसं कलम 283 अंतर्गत कारवाई केली. यात नानासाहेब मिटु मुंढे यांनी माल वाहतुक करणारा मिनी ट्रक  एम एच 12 ई क्यु 5238 हा  रहदारीस धोका अडथळा निर्माण होईल अशा रितीने  लावलेला आढळले.

3 ठिकाणी चोरी 

उस्मानाबाद  -  अमर सुर्यवंशी रा.सांजा  हे आपल्या अर्धवट बांधकाम असलेल्या व दारे- खिडक्या नसलेल्या आपल्या घरात  दिनांक 26-27  जुन दरम्यानच्या रात्री कुटुंबासह झोपलेले होते. या वेळी अज्ञाताने त्यांच्या घरात प्रवेश करुन घरातील तीन स्मार्ट फोनसह  10,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या अमर सुर्यवंशी यांनी दि. 27 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : संतोष बुटटे रा.तुळजापूर यांनी घरासमोर ठेवलेली स्प्लेंडर मोटार सायकल क्रमांक एम एच 25 एस 3039 ही दिनांक 12 जुन रोजी पहाटे अज्ञाताने  चोरुन नेली. अशा मजकुराच्या संतोष  यांनी दि. 27 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 कळंब : माणीक डिकले रा.कल्पना नगर,कळंब यांनी घरासमोर ठेवलेली स्प्लेंडर मोटार सायकल क्रमांक एम एच 25 व्ही  3078 ही दिनांक 27 जुन रोजी पहाटे अज्ञाताने  चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web