कोविड मनाई आदेश झुगारुन हॉटेल- दुकाने व्यवसायास चालू ठेवणाऱ्यांवर गुन्हे दाखल

 
Osmanabad police

उस्मानाबाद - कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी मास्क वापर, दुकाना संबंधी वेळेचे निर्बंध असे इत्यादी मनाई आदेश जारी केले आहेत. या आदेशांचे उल्लंघन करुन दि. 21 जून रोजी तामलवाडी टोलनाका येथे 1)राजेंद्र वरदेकर 2)त्रिंबक चौघुले 3)ज्ञानेश्वर नेटके या तीघांनी नाका- तोंडास मास्क न लावता आपापल्या ताब्यातील हॉटेल मध्ये व्यवसाय करत असतांना तामलवाडी पो.ठा. च्या पथकास आढळले. तर आळणी येथे 4)आगतराव किर्दत हे आपल्या ईलेक्ट्रीक व पान शॉप दुकानात नाका- तोंडास मास्क न लावता व्यवसाय करत असतांना उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 अंतर्गत तामलवाडी पो.ठा. येथे 3 व उस्मानाबाद  (ग्रा.) पो.ठा. येथे 1 गुन्हा नोंदवला आहे.

 
सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपनाचे कृत्य करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद -  काका शिवाजी गाडे, रा. तेर, ता. उस्मानाबाद यांनी ॲपे मॅजीक वाहन क्र. एम.एच. 25 पी 3567 हा सार्वजनिक ठिकाणी धोकादायकरित्या रहदारीस अडथळा निर्माण होईल अशारितीने दि. 24 जून रोजी तडवळा रस्त्यावरील ढोकी बस थांब्याजवळ उभा केला असतांना ढोकी पो.ठा. च्या पथकास आढळले.

तर विठ्ठल गायकवाड, रा. पारसखेड, ता. उमरगा यांनी उमरगा येथील डिग्गी रस्त्यावर रहदारीच्या ठिकाणी आपल्या आतगाड्यावर अग्नी प्रज्वलीत करुन जिवीतास धोका होईल अशा निष्काळजीपनाचे कृत्य करत असतांना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.

यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 283 अंतर्गत ढोकी येथे व भा.दं.सं. कलम- 285 अंतर्गत उमरगा येथे गुन्हा नोंदवला आहे.

From around the web